केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक संपली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे पी नड्डा यांची देखील भेट घेतली. ते राजीनाम्यावर ठाम आहेत. साम टीव्हीच्या सुत्रांच्या माहितीनुसार अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांनी काम सुरु ठेवण्याचा सल्ला दिला. राजीनामा देऊ नका, असे शाह यांनी सांगितले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर NDA च्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. बैठकीसाठी अमित शाह, राजनाथ सिंह पोहोचले, अजित पवार, प्रफुल पटेल, एकनाथ शिंदे, देखील बैठकीत असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. याबाबत काल रात्री त्यांनी ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली.
अमित शाह यांच्या घरी ही बैठक झाली. राजीनामा देऊन संघटनेत काम करायचे असल्याचे त्यांनी अमित शहा यांना सांगितले. त्यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावावर भाजप नेतृत्वाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
महाराष्ट्रात भाजपची लोकसभा सदस्य संख्या २३ वरून नऊ झाली आहे. याच कारणामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मान्य झाला तर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चेसाठी गिरीश महाजन हेच कायम समोर असतात. भाजपचे संकटमोचक म्हणून देखील त्यांच्या नावाची चर्चा असते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबादारी देऊ शकते. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती आली नाही. मात्र दिल्लीत महाराष्ट्रातील राजकारण चांगलच चर्चेत आलं आहे.
या नावांची देखील चर्चा -
चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन
सुधीर मुनगंटीवार
आशिष शेलार
विनोद तावडे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.