राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकिकडे एकनाथ शिंदे तीन दिवसीय सुट्टीवर आहेत तर दुसरीकडे अजित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीत बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मंत्रालयात सरकार बदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहे. ( Discussion of change of government Mantralaya after sharad pawar big statement )
शरद पवार यांनी काल आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यात सत्ताबदल होईल अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सरकार बदलणार असल्याच्या उघड उघड चर्चा होत आहेत. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. तसेच अंतिम टप्प्यात काम असलेल्या कंत्राटदारांमध्ये देखील धास्ती निर्माण झाली आहे.
मंत्रालयात येणारे आमदार आणि इतर लोक आपले कामे पटापट संपवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे अग्रह धरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरील दबाव वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अनेक नेते राज्यात सत्ताबदल होईल असा दावा करत आहे. अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत.
अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे, असं म्हटलं आहे. या सर्व घडामोडींमुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.