राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. यावर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. कोल्हापूर आणि बदलापूर प्रकरणाने संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशातच आता अभिनेते तसेच ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राची सर्वत्र चर्चा होत आहे.