Loksabha Election : महायुतीमध्ये शिंदे गटाचा लोकसभेसाठी 18 जागांसाठी आग्रह!

Political News : राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महायुती असल्याने यामध्ये जागावाटप कसे होणार अशी उत्सुकता राज्याला लागून राहिली आहे.
Shinde, Pawar & Fadanvis
Shinde, Pawar & Fadanvisesakal
Updated on

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महायुती असल्याने यामध्ये जागावाटप कसे होणार अशी उत्सुकता राज्याला लागून राहिली आहे.

मात्र शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत १२ जागांच्या फार्म्युल्यावर खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. शिवसेनेनं १८ जागा लढवाव्यात, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला असल्याचे समजते. (maharashtra politics Lok Sabha Election Shinde group marathi news)

Shinde, Pawar & Fadanvis
Maharashtra assembly Interim Budget session 2024: अर्थसंकल्पातील प्रत्येत अपडेट वाचा एका क्लिकवर...

शिंदे गटाला १२ जागा तर अजित पवार गटाला मात्र चारच जागा मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावरूनच हा फॉर्म्युला ठरण्याआधीच शिंदे यांची भेट घेत बारा जागांसाठी ना पसंती व्यक्त केली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये १८ जागा लढवाव्या, अशी मागणी ही शिंदे गटाच्या नेत्यांनी शिंदे यांच्याकडे केली आहे.

राज्यात लोकसभेसाठी महायुतीचं जागावाट भाजप २८ ते ३२ जागापर्यंत तर शिंदेगट १२ ते १६ आणि अजित पवार गटाला ४ ते ८, या आकडेवारीनुसार कमी जास्त प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. या तिन्ही पक्षांकडून याबद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाऊ शकते.

पण अद्याप महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही, केवळ चर्चा झाल्या आहेत. बोलणी सूरू आहे. ज्याच्याकडे ज्या जागा आहेत. त्या गृहित मानल्या जातील. त्यात फेरबदल करायचे म्हटल्यास चर्चेला वाव असल्याचे प्रत्येक पक्षातील वरिष्ठ माहिती देत आहे. (Latest Marathi News)

Shinde, Pawar & Fadanvis
Jalgaon Political News : रावेरमध्ये ‘कमळा’साठी तिघे इच्छुक, ‘तुतारी’ला उमेदवाराचा शोध!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.