जागा वाटपावरून मविआत बिघाडी होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्या नाराजीनंतरही ठाकरे गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra Politics lok sabha seat allocation in mahavikas aghadi Sanjay Raut Sharad Pawar )
लोकसभेच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. विधानसभेला अजून वेळ आहे. मागच्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे 19 खासदार होते. आमचा लोकसभेतला 19 चा आकडा कायम राहील. असे ठामपणे सांगत कदाचित वाढेल सुद्धा त्यात कोणाला त्रास व्हायचं काही कारण नाही असा टोमणादेखील मित्रपक्षातील नेत्यांना राऊत यांनी मारला.
दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी आम्ही 18 जागा लढवणार असून, दादरा नगर हवेलीचा एक असे आमचे एकूण 19 खासदार संसदेत जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार या बाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत ठाकरे गटाकडून वीस जागांवर दावा करण्यात आला होता.
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.