Maharashtra Politics: ...तेव्हा आमदारांना मोबाईलच नव्हे तर टीव्हीसुद्धा पाहून दिला नव्हता; बड्या नेत्याच गौप्यस्फोट

गुवाहाटीला जाऊन अंतर्वस्त्रे खरेदी केलं...
Maharashtra Politics
Maharashtra Politics
Updated on

ज्या बंडाने संपर्ण देशात खळबळ उडवली होती, ज्या बंडामुळे एक सरकार कोसळलं त्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षापूर्तीनंतर अनेक खळबळजनक दावे समोर येत आहेत. अशातच एका बड्या नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (maharashtra politics Mobile phones were taken away from MLAs, they were not even allowed to watch TV )

बंडावेळी आमदारांकडील मोबाइल काढून घेतले होते. तसेच त्यांना टीव्हीसुद्धा पाहून दिला नव्हता असा खळबळजनक खुलासा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Maharashtra Politics: 'अर्धवटराव, काय म्हणालो ते ऐकलंच नाही...' फडणवीस ठाकरेंना असं का म्हणाले?

सुरतला गेल्यानंतर आमदारांकडील मोबाइल काढून घेतले होते. त्यांना टीव्हीही पाहू दिला नव्हता. गुवाहाटीला पोहोचल्यावरच आमदारांना टीव्ही बघायला परवानगी दिली गेली. घरच्यांसोबत संपर्क साधण्याची परवानगी दिली.(Latest Marathi News)

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये एक छोटी चूक झाली असती, तरी हे ऑपरेशन सपशेल अपयशी ठरले असते. देशभर भाजपची नाचक्की झाली असती, असे सांगत सुरत ते गुवाहाटी बंडाच्या वर्षपूर्तीच्या आठवणींना रवींद्र चव्हाण यांनी उजाळा दिला.

असं राबवण्यात आलं ऑरपेशन लोटस

दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात अशा पद्धतीने ऑपरेशन लोटसचे तीन वेळा प्रयत्न केले. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदार यांना एकत्र करून उठावाचे नियोजन झाले होते. पण, तांत्रिक अडथळा आल्याने तो प्रयत्न फसला. त्यानंतर कोविड आला. २०२१ दरम्यान प्रयत्न झाला. पण, वरिष्ठांनी हिरवा कंदील न दाखविल्यामुळे थांबला. अखेर २०२२चा जून महिना ठरला. पक्के नियोजन झाले आणि ते यशस्वी झाले.

त्याचे नियोजन हा अविस्मरणीय अनुभवांचा खजिना असून, सगळे काही सांगता येणे शक्य नाही, असेही चव्हाण म्हणाले. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Maharashtra Politics: विधान परिषदेचं गणित बिघडलं? ठाकरेंच्या विरोधी पक्ष नेते पदावर NCP ठोकू शकते दावा

सुरुवातीपासून ४० जण सोबत होतेच, पण ते टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले होते, जे घडले, ते सगळे दिल्ली पातळीवरून घडले. त्याचे मार्गदर्शक फडणवीस होते. यांच्याच नियोजनानुसार हे ऑपरेशन पार पडले. (Latest Marathi News)

मविआचे आणखी २० आमदार सोबत यायला तयार होते, आता ते मविआत असले, तरी मनाने युतीसोबत आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. सरकार स्थापन झाले आणि या ऑपरेशनमध्ये जबाबदारी पार पाडणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला.

शिंदेंनी भाजपसोबत सुरू असलेल्या उठावाच्या वाटाघाटींची कल्पना दीर्घकाळ स्वत:च्या मुलाला म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांनाही दिली नव्हती. ही गोपनीयता पाळण्याच्या सूचना भाजपनेच शिंदे यांना केल्या होत्या व त्या त्यांनी कसोशीने पाळल्या, असे चव्हाण म्हणाले.

चालकालाही माहिती नव्हते गाडीत कोण आहे

ऑपरेशन लोटससंदर्भात संपूर्ण माहिती असलेल्या एक - दोन व्यक्ती होत्या. बाकी अनेकांना केवळ त्यांच्यावरील जबाबदारीची माहिती दिली होती. त्यामुळे आपण एका मोठ्या ऑपरेशनमधील छोटी जबाबदारी पार पाडत आहोत, याची अनेकांना कल्पना नव्हती. सोबत आलेल्या आमदारांना सुरतपर्यंत ते कोणत्या वाहनात बसले आहेत, वाहन कोण चालवतो आहे, याची माहिती नव्हती. तर वाहन चालविणाऱ्याला त्याच्या वाहनात कोण बसले आहे, याची माहिती नव्हती.

कुणी वेशांतर करून, तर कुणी पोलिसांच्या बंदोबस्तात वसईमार्गे सुरतला गेले. तिकडे गेल्यावर त्या हॉटेलमध्ये असलेली कडक सुरक्षा बघितल्यावर अनेक आमदारांना आपण एका मोठ्या बंडातील एक भाग असल्याचे कळले, असे चव्हाण यांनी सांगितले.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Maharashtra Politics : इच्छा आहे तोपर्यंतच 'मविआ'मध्ये राहू म्हणणाऱ्या राऊतांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले...

सुरतला घेतले कपडे, अंतर्वस्त्रे

सर्व आमदार अंगावरच्या कपड्यानिशी आले होते. सुरतला गेल्यावर अनेकांना आपल्याला दीर्घकाळ घरापासून दूर राहावे लागणार असल्याची कल्पना आली. मग अनेकांनी शर्ट, पॅन्ट, अंतर्वस्त्रे, औषधे मागविली.(Latest Marathi News)

सुरत व गुवाहाटीचा मुक्काम हे एक दिव्य होते. कुणी निघून जाऊ नये, याकरिता एकीकडे सर्वांवर नजर होती. राजकीय घडामोडींमुळे तणाव होता. मात्र, आमदारांनी गाणी गात, पत्ते, कॅरम खेळत व गप्पाटप्पा करीत ताण कमी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()