CM शिंदे सुट्टीवर जाताच मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच सुरू;अजितदादांनंतर फडणवीसही 'भावी मुख्यमंत्री'

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सुट्टीवर गेले आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra Politics
Updated on

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सुट्टीवर गेले आहेत. सध्या ते साताऱ्यात आहेत. अशातच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच सुरु झाली आहे. काल अजित पवारांच्या सासरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले. तर आज देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपूरात बॅनर झळकले आहेत. अशातच आज अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. (Maharashtra Politics Over CM devendra fadnavis ajit pawar poster viral Eknath Shinde)

राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अशातच नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे बॅनर झळकले आहे.

संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नागपूर शहरातील बुटीबोरी परिसरात ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे होर्डिंग्ज लागल्याचं दिसून येत आहे. बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी लावले होर्डिंग्ज सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत.

Maharashtra Politics Over CM devendra fadnavis
Maharashtra Politics Over CM devendra fadnavis
Maharashtra Politics
Ajit Pawar : जावईबापू मुख्यमंत्री होऊदे रे बाबा! पवारांसाठी सासुरवाडीने घातलं साकडं

तर अजितदादांच्या सासरवाडीतही...

राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. यातच अजित पवार यांची सासरवाडी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत.

शहरातील चौका चौकात तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.