Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजकीय बंडानंतर राज्यात सत्तासंघर्ष पेटला आहे. या सत्तासंघर्षात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा हातभार मोठा आहे. शिवसेनेतील फुटीमागे भाजपचं पाठबळ असल्याचे बोलले जाते.
यादरम्यान शिंदे-ठाकरे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष देखील पाहायला मिळाल. दरम्यान आता ठाकरे-फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष संपणार का? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळातून केला जातो आहे.
युवासेनेते नेते आदित्य ठाकरे आणि खुद्द देवेंद्र फडणवीस याच्या विधानांनुळे राजकीय वर्तुळात याबद्दलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
यानंतर भाजपचे नेते फडणवीस यांनी देखील याबद्दल सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या विधानाला दुजोरा देत फडणवीसांनी देखील हात पुढे केला आहे. ते म्हणाले की, मी देखील वारंवार सांगितलं आहे की आम्ही वैचारिक विरोधक आहोत. शत्रू बिलकूल नाही. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे ज्यामध्ये आपण वैचारिक विरोधक असतो. अलिकडच्या काळात शत्रूत्व दिसतंय. जे संपवण्याची गरज आहे.
मला जेव्हा जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. वैचारिक विरोधक झालो कारण त्यांनी दुसरा विचार पकडला मी दुसापा विचार केला. यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.