गोरेगाव इथल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने काल रात्री उशिरा अटक केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करत राऊतांवर खोचक टिपणी केली आहे.(maharashtra politics Sanjay Raut Arrest cm eknath shinde)
औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी 'तो ८ वाजताचा भोंगा आता बंद झाला आहे. शिवाय ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राऊतांच्या अटकेनंतर मातोश्रीवर तातडीची बैठक होणार आहे. काल मातोश्रीबाहेर तसंच संजय राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठा गराडा घातला होता. तिथे संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या जात होत्या. १६ तासांच्या चौकशीनंतर रात्री अखेर संजय राऊतांना ईडीने अटक केली आहे.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता झाल्याचा ईडीचा आरोप आहे. तसेच संजय राऊत यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत झालेल्या संबंधित व्यवहारात मनीलॉण्डरिंग झाल्याचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.