महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा वाद निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक हल्ले सुरु आहेत. काल शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. आता या टीकेला फडणवीस आणि शिंदे कसा प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
उद्धव ठाकरे यांनी काल तुम्ही हा शब्द नाही तर तू शब्द वापरला... आम्ही म्हणतो तुम्ही जाणार आहात आम्ही राहणार आहोत. फडणवीस हे संघ विचारांचे आहेत, परंतु त्यांच्या टोळीचा संघ विचारांशी काही संबंध नाही. फडणवीस हे लफंग्याच्या टोळ्या घेऊन राज्यात दळभद्री राजकारण करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. "मी कुणाच्या नादी लागत नाही, पण माझ्या नादी कोणी लागलं तर सोडत नाही," असे फडणवीस म्हणाले होते. यावर संजय राऊत म्हणाले, "फडणवीसांना आम्ही कधी म्हणालो नादी लागू नका, लागा नादी."
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर देखील टीका करत म्हटलं, "माझं तोंड वाईट आहे, ताई माई अक्का, तुमचा पक्ष छक्का अस होऊ नये म्हणजे झाल." राऊत यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्या टोळ्यांवर नामर्द, दळभद्री आणि लफंग्याच्या टोळ्यांचा आरोप केला. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
"आमचं आव्हान आहे, सगळ्या यंत्रणांच कवच कुंडल काढून समोर या, तुम्हाला 20 फूट गडल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.
कुटुंब, मुल बाळ, घरापर्यंत कधी राजकारण आल नव्हतं. माणूस किती अनीतीमान, भ्रष्ट, क्रूर असू शकतो याचं उदाहरण फडणवीस आहेत. फडणवीस यांचे आणि त्यांच्या टीळीचे संघ विचारांशी काहीही सबंध नाही, असे देखील राऊत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.