Maharashtra Politics : ''पवार अन् राष्ट्रवादीच्या चर्चा एन्जॉय करा''

अजित पवार जयंत पाटील हे दोघे विकासमकामात आणि पक्ष संघटनेत खूप व्यस्त आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawar Sakal
Updated on

Supria Sule News : राष्ट्रवादीबद्दल गॉसिप करायला लोकांना खूप आवडतं. अजित पवार जयंत पाटील हे दोघे विकास कामात आणि पक्ष संघटनेत खूप व्यस्त आहेत. त्यामुळे ते गॉसिपमध्ये फारसा वेळ घालवत नाही. म्हणूनच पक्षाचा परफॉर्मन्स एवढा चांगला झालाय. आमच्या कुटुंबाबद्दल आणि पक्षाबदल जेवढी आमची चर्चा नसते तेवढी बाहेर असते, एन्जॉय करा असा सल्ला खासदार सुप्रीया सुळे यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी राज्यतील कामकाजावरदेखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sharad Pawar
Dasara Melava: शरद पवार म्हणतात, एकनाथ शिंदेंनाही अधिकार पण…

तुरुंगात असणाऱ्या संजय राऊत, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना राष्ट्रवादीने वाऱ्यावर सोडलं या आरोपावर सुप्रीया सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्यांवरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मलिकांसह कुणालाच वाऱ्यावर सोडलं नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. भाजपकडून करण्यात येणारे आरोप चुकीचे असून, नवाब मलिक यांना कधी डावललं नाही. मी रोज त्यांच्या मुलींशी बोलत असते. तसेच अजूनही ते आमचे चीफ स्पोक पर्सन असल्याचे त्या म्हणाल्या. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या कुटुंबाची २४ तास माझा कॉन्टॅक्ट असतो असेही सुप्रीया सुळेंनी म्हटले आहे.

Sharad Pawar
MNS : ठाकरेंच्या शिवसेनेला मनसैनिकांनी पुन्हा डिवचलं; आता लक्ष प्रत्युत्तराकडे

ऑन पालिका आयुक्त

अजित पवार पालकमंत्री असताना दर आठवड्याला पुण्यातील कामांचा आढावा घेत होते. मात्र, आता दुर्दैवाने तीन महिन्यापासून पालकमंत्री नाही, त्यामुळे कामांचा आढावा होत नाहीय. वारजे, धायरी, नऱ्हे भागात कचरा आणि पाण्याचे प्रश्न आहेत, त्याचा फॉलोअप घेण्यासाठी आयुक्तांना भेटल्याचेही त्या म्हणाल्या.

देशातील लोक मला फॉलो करतात.

माझं आयुष्य सगळं पारदर्शक आहे. १३ वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. सोशल मीडियावर माझ्या कामाचा आढावा घेतला तर समजेल, देशातील लोक मला फॉलो करतात. मला आनंद होत आहे की, देशाच्या अर्थमंत्री बारामतीत येत आहेत. मी त्यांचं स्वागत करते. बारामती लोकसभा मतदार संघात अनेक चांगल्या गोष्टी, संस्था आहेत. त्यामुळे जर त्यांना वेळ मिळाला तर, त्यांनी या ठिकाणांना आवश्य भेट द्यावी.

Sharad Pawar
Delhi : CM शिंदे उद्या पुन्हा दिल्ली दरबारी; काय खलबतं शिजणार?

बाहेरून आलेल्यांना भाजपात संधी पण...

अनेक जण भाजपमध्ये जातात आणि त्यांना मोठी जबाबदारी मिळते. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटत की, जेव्हा संघर्षाचा काळ होता तेव्हा भाषण देण्यापासून ते सतरंज्या उचलण्याच काम ज्या भाजप कार्यकर्त्यांनी केलं त्यांना आता भाजपात कुठे मान सन्मान होत नाही. मात्र, बाहेरून आलेल्यांचा मान सन्मान होतो. त्यामुळे मला अनेक वर्षे संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांचे वाईट वाटतं.

Sharad Pawar
Shivsena : दसरा मेळाव्याचा प्लॅन बी; उद्धव ठाकरे बाळासाहेबांची आयडिया वापरणार?

आमच्या काळात दसरा मेळावे व्हायचे...

यावेळी त्यांनी राज्यात दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, हे खूप दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री हे पद खूप मोठे असते आणि ते सर्वसमावेशक असेल पाहिजे, असे पवार साहेब म्हणाले होते. आमच्याही काळात दसरे मेळावे व्हायचे. दिलदारपणे त्या व्यासपीठवर आमच्या विरोधात भाषणे व्हायची, आम्हीही उत्सुकतेने ते ऐकायचो आणि पाहायचो.

मोठा नेता हा फक्त पदाने नाहीतर कर्तृत्वाने होतो. मोठा नेता दिलदार असला पाहिजे, पणं दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी ही गोष्ट आहे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना बाळासाहेब शिवतीर्थावरुन दिलदारपणे टीका करायचे. याला गंमत म्हणातात असा टोलादेखील सुप्रीया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.