बंडखोर केसरकरांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 5 मुद्दे

आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत असं शिवसेनेचे गुवाहटीतील बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले.
Dipak Kesarkar
Dipak KesarkarSakal
Updated on

Eknath Shinde News: आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाहीत, आम्ही शिवसेनेचाच भाग आहोत पण आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत असं शिवसेनेचे गुवाहटीतील बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले आहेत. ते शिंदे गटाकडून आयोजित केलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.

(Eknath Shinde News)

नोटीसा पाठवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना निलंबनाची मागणी केल्यावर नोटीसा पाठवण्यात येणार आहेत त्यावर बोलताना ते म्हणाले की, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवार आणि रविवार गृहित धरून नोटीसा दिल्या आहेत. कायद्यानुसार आमच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकत नाही आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करणार आहोत असं ते बोलताना म्हणाले.

Dipak Kesarkar
पुण्यात शिवसेना फुटली; वरिष्ठ पदाधिकारी शिंदेंच्या गटात जाणार

आम्हीच शिवसेना...! पाठिंबा काढण्याचा प्रश्नच नाही

आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाहीत, आम्ही शिवसेनेचाच भाग आहोत, आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान आज शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव वापरता येणार नाही असा निर्णय घेतला गेला आहे. यासंदर्भात ते निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार आहेत यावर उत्तर देताना, निवडणूक आयोग जो निर्णय देईल त्या निर्णयाचं आम्ही पालन करणार आहोत असं ते म्हणाले. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रात कधी येणार यावर विचारले असता सध्या महाराष्ट्रात येणं सुरक्षित नाही असं त्यांनी सांगितलं.

संजय राऊतांचं बोलणं जास्त गांभीर्याने घेत नाही

"संजय राऊत यांच बोलणं आम्ही जास्त गांभीर्याने घेत नाही, आम्ही कोणतीही संघटना तोडली नाही आम्ही शिवसेनेसोबत आहोत, आजही आणि उद्याही शिवसेनेतच आहोत. संजय राऊत हे फायर बोलतात त्यांच्या बोलण्याने आग लागते ते आमचे विधिमंडळ नेते नाहीत म्हणून आम्ही त्यांच बोलण जास्त गांभीर्याने घेत नाहीत." असं ते म्हणाले आहेत.

Dipak Kesarkar
आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलोय हा गैरसमज - दीपक केसरकर

निधीसाठी हात जोडावे लागायचे

"आम्ही आमच्या मतदारसंघात विकास कामे करत असताना निधीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे हात जोडावे लागत होते त्यामुळे आम्ही नाराज आहोत. या बंडाची ठिणगी राज्यसभेच्या निवडणुकीतच लागली होती पण ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसून आली. आम्ही ईकडे येण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या गाडीत होतो त्यांनाही समाजावून सांगितलं. शिवसेनेने अधिकृतरित्या भाजपसोबत जायला पाहिजे असं आम्ही कित्येकवेळा सांगितलं आहे." असं बोलत केसरकर यांनी पक्षाबद्दलची आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि आपले नेते एकनाथ शिंदे हेच आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र सध्या आमच्यासाठी सुरक्षित नाही

आम्हाल येण्यासाठी महाराष्ट्र सध्या सुरक्षित नाही, ज्यावेळी वातावरण शांत होईल त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात येऊ असं ते म्हणाले आहेत.

आयोगाने निर्णय दिला तर आम्ही त्याचं पालन करू

शिवसेनेच्या बैठकीत शिंदे गटाला बाळासाहेब आणि शिवसेनेचं नाव लावू देणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना केसरकर म्हणाले की, निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, त्या निर्णयाचं आम्ही पालन करू असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()