दिवसभरात राज्यात अन् देशात घडलेल्या संपूर्ण घडामोडी जाणून घ्या, एका 'क्लीक' वर

शिंदे सरकारमध्ये नाराजी नाट्याला सुरूवात
दिवसभरात राज्यात अन् देशात घडलेल्या संपूर्ण घडामोडी जाणून घ्या, एका 'क्लीक' वर
Sakal
Updated on

आज शिवसेना पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येणार आहे. याबाबत दुपारी सुनावणी होईल. तसेच राज्यभरात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यातील, देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वांच्या बातम्याचा आढावा घ्या फक्त एका क्लिकवर

अजित पवारांची शिंदे गटाच्या मेळाव्यावर जहरी टीका

अजित पवार म्हणाले की, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भाषण करताना म्हणतात ही सर्व लोक आपणहून आली. अरे निम्मी लोक तुमच्या भाषणातून निघून गेली. मग आपणहून आली तर लोकांनी खुर्च्या रिकाम्या का केल्या? एसटीसाठी १० कोटी भरतात. एवढे पैसे कुठून आणले. तुम्ही लोकांच्या समस्या सोडण्यासाठी मुख्यमंत्री झालात हे विसरू नका, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

शिंदे सरकारमध्ये नाराजी नाट्याला सुरूवात

भाजपबरोबर सत्तेचा संसार थाटून चार महिने होत नाही, तोच शिंदे गटाविरुद्ध भाजप असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. त्याला कारणीभूत पालकमंत्री दादा भुसे हे असून, शहरात शिंदे गटाची ताकद वाढविण्यासाठी महापालिकेस संबंधित प्रश्नांवर परस्पर बैठक घेऊन भाजपच्या आमदारांना निमंत्रित केले जात नसल्याची तक्रार करण्यात आल्याने भाजप व शिंदे गटात वादाला नवे तोंड फुटले आहे.

दिल्लीतील केंद्रीय शाळेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीने शाळेच्या शौचालयात दोन विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. जुलै महिन्यात आपल्यासोबत हा प्रकार घडल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. याबाबत मुलीने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलीस आणि शाळेला नोटीस बजावली आहे.

जगनमोहन रेड्डींवर बहिणीने केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप

YSR तेलंगणा पक्षाचे प्रमुख आणि आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण YS शर्मिला यांनी तेलंगणामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. शर्मिला यांनी आरोप केला आहे की, "भारतातील सर्वात मोठा घोटाळा उघड करण्यासाठी मी येथे आले आहे, कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प घोटाळा मोठा आहे. कारण त्यात केवळ आभासी पैसाच नाही तर खरा पैसा आणि सरकारी तिजोरीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापरही झाला आहे.

दसरा मेळाव्यावरून नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीत टीका

शिव्याशाप देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली होती का? असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यादिवशी घेतलेल्या सभेवर निशाणा साधला आहे.

ज्ञानवापीचा निर्णय लांबणीवर

उत्तरप्रदेशमध्ये असलेल्या ज्ञानवापी मशिदीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. ११ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.

चंद्रकांत पाटलांचे बेताल वक्तव्य

एकवेळ आईवडिलांना शिव्या द्या पण मोदी शाहांना दिलेल्या शिव्या सहन करू शकणार नाही असं वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं.

शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता

दिवाळी तोंडावर आली असून यानिमित्ताने राज्य सरकार आणि एसटी महामंंडळाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेचा आदिपुरूष चित्रपटाला पाठिंबा

आदिपुरूष या चित्रपटावरून अनेक वाद निर्माण झाले होते. त्यानंतर मनसेच्या चित्रपट सेनेने आदिपुरूष या चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

शिवसेनेच्या थेट पक्षाध्यक्षपदावरच एकनाथ शिंदेंचा दावा

एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेनेच्या पक्षाध्यक्षपदावर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यामध्ये शिवसेना पक्षाध्यक्षपदाचा उल्लेख केलाय. 40 आमदार आणि 12 खासदारांसह लाखो प्राथमिक सदस्य पाठीशी असल्याचाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय.

सरन्यायाधीश लळीत यांना केंद्र सरकारने पत्र पाठवून उत्तराधिकाऱ्याचं नाव देण्याची मागणी

शिंदे सरकारला १०० दिवस पूर्ण

शिंदे फडणवीस सरकारला आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आजपर्यंत १०० दिवस पूर्ण झाले आहेत.

सरन्यायाधीश लळीत यांना केंद्र सरकारने पत्र पाठवून उत्तराधिकाऱ्याचं नाव देण्याची मागणी

पक्षचिन्हाबाबत आज सुनावणी नाही

शिवसेना आणि शिंदे गट यांच्या दरम्यानची केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी लांबणीवर पडली असून शिवसेना आज पुरावे सादर करणार आहे.

EDचे दिल्लीतील ३५ ठिकाणांवर छापे

EDने दिल्लीतील ३५ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. कथित दारूघोटाळा (अबकारी मनी लाँडरिंग) प्रकरणी ईडीने दिल्ली, पंजाब आणि हैद्राबाद येथील ३५ ठिकाणांवर छापेमारी केली.

दिवाळीनिमित्त ज्यादा एस टी बसेस सोडणार 

दिवाळीनिमित्त राज्यात ज्यादा एसटी बसेस सोडणार असल्याचं महामंडळाने स्पष्ट केलं आहे. पुणे विभागातून ८०० ज्यादा बस सोडणार आहेत.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा स्थगित

राष्ट्रीय प्रज्ञाशोध यात्रा स्थगित करण्यात आली आहे. NCERT कडून संकेतस्थळावर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

चिन्हांबाबत शिंदे गटाची आयोगाकडे याचिका

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा नसतानाही अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आपल्या गटाच्या वतीने उमेदवारी दाखल करीत आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्हांबाबत असलेला वाद निवडणूक आयोगाने तातडीने सुनावणीस घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.

शशी थरूरांनी जाहीरनामा केला प्रसिद्ध

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेले शशी थरूर यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत.

राज्यात पावसाचा येलो अलर्ट

परतीच्या पावसाने राज्यात जोरदार बॅटिंग केली असून राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. तर आज राज्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांना सतर्कतेचे अवाहन करण्यात आले आहे.

प्रियकरासाठी मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्या

लहान बहिणीने मोठ्या बहिणीच्या प्रेम संबंधांची माहिती घरच्यांना दिली या रागातून सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची गळा अवळून हत्या केली आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे 30 सप्टेंबरला घडली आहे.

वांद्रेत झालेल्या अपघाताचे कारण आले समोर

दसऱ्याच्या दिवशी पहाटे मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. मोबाईलची बॅटरी संपल्याने गाडीचा चालक मोबाईल चार्जिंग लावत होता त्यामुळे त्याचे लक्ष भरकटले आणि हा अपघात झाला.

आज शिवसेना पक्षचिन्हाबाबत सुनावणी

शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचं? यावर केंद्रीय निवडणुकीची निकाल आज येणार आहे. तर आयोगाच्या या निकालाकडे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.