अल्पावधीतच शिवसेनेच्या फायर ब्रॅन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे या नेहमी आपल्या परखड वक्तव्याने चर्चेत असतात. दरम्यान, अंधारे यांच्या पाठीमागे केवळ शिवसेनाच नाही तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारीदेखील उभे आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याची फेसबुक पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात व्हायरल होताना दिसत आहे. (Maharashtra Politics ShivSena Sushma Andhare Retired ips officer written facebook post viral )
सुषमाताई तुमची मांडणी योग्य दिशेने चालली आहे. तुम्हाला ते धमकावून विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा, असा सल्ला पोलिस अधिकाऱ्याने अंधारे यांना दिला आहे.
काय आहे पोस्ट?
सुषमा अंधारे यांच्या जाळ्यात कोण कोण अडकले?
आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही असे जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि
मंडळींचे हिंदुत्व उघडे नागडे करून दाखविले. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले गेले. सुषमाताईंनी संयतपणे विरोधकांना प्रश्न विचारून राजकीय दृष्ट्या नामोहरण केले.
त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. बचाव करता येत नाही म्हणून त्यांनी ज्याना जाणवे व शेंडीच्या पलीकडचा हिंदू धर्म माहीत नाही त्या तथाकथित वारकऱ्यांना पुढे केले. त्यात नकली वारकऱ्यांचा दर्जा दिसून आला. तात्पर्य एका महिलेने तीन-चार महिन्यात फेकलेल्या जाळ्यात एवढे मासे अडकले.
ती क्लिप दहा-बारा वर्षांपूर्वीची असताना ती पुन्हा दाखवली गेली व त्यावर तथाकथित वारकरी महिला व पुरुषांनी सुषमा अंधारे यांना वारकऱ्यांना न शोभणारी भाषा वापरली. एवढेच नव्हे तर हल्ला करण्याची फाडून टाकण्याची भाषा केली.
हे सगळे देवेंद्र फडणवीस यांचे भाडोत्री सैनिक दिसतात. राजकारण्यावर शाई फेकली तर खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे देवेंद्र फडणवीस दाखल करतात मग सुषमा अंधारे यांना दिल्या गेलेल्या धमक्याबाबत देवेंद्र अजूनही अभ्यासच करत आहेत काय? यात गृहमंत्री ही उघडे पडले. देवेंद्रजी कायद्याचा अभ्यास लवकर पूर्ण करा नाहीतर तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही येणार आहोत.
सुषमाताई तुमची मांडणी योग्य दिशेने चालू आहे. तुम्हाला ते धमकावून विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. पक्ष असो अगर नसो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत! अशा मांडणीतूनच समाज व्यवस्थेची रचना आधुनिकतेकडे व घटनेवरील आधारित मूल्यावर पुढे नेता येईल. सिव्हिल सोसायटी म्हणून ते आपणा सर्वांचे एक कर्तव्यच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.