मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदार झिशान सिद्दीकी हे बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सत्र सुरूच आहे. अनेक बडे नेते पक्ष सोडत आहेत. तर आता पुन्हा एक आमदार पक्ष सोडण्याचा विचार करत आहे. यावर आता खुद्द झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी पक्षातील एक खंत बोलून दाखवली आहे.