Maharashtra Poltical Crisis: आज होणार 'या' १६ आमदारांचा फैसला

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे.
Maharashtra Poltical Crisis
Maharashtra Poltical Crisis
Updated on

आज राज्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. हे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आजच लागणार आहे. तर अपात्रतेची टांगती तलवार असलेले१६ आमदार नेमके कोण आहेत? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. (Maharashtra Poltical Crisis uddhav thackeray vs eknath shinde and 16 mla)

महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषाची पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला. तब्बल ९ महिने या संपूर्ण सत्तासंघर्षावर सुनावणी झाली. मार्च महिन्यात ही संपूर्ण सुनावणी पार पडली. ज्यानंतर कोर्टाने याबाबत निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालय निकाल देणार आहे.

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेवर असताना एकनाथ शिंदे यांनी साधारण ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं होतं. Maharashtra Politics

अपात्रतेची टांगती तलवार असणारे ते १६ आमदार कोण?

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री असून ते ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. Maharashtra Politics


आमदार तानाजी सावंत

तानाजी सावंत हे शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री असून ते आरोग्य खात्याचा कारभार पाहत आहे. सावंत हे धाराशीव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

आमदार अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार यांच्याकडे सध्या राज्याचं कृषीखातं आहे. ते कृषीमंत्रि असून सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

आमदार यामिनी जाधव

आमदार यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर त्या निवडून आल्या होत्या.

आमदार संदीपान भुमरे

संदीपान भुमरे हे शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री असून ते संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

आमदार भरत गोगावले

भरत गोगावले हे शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आहे. ते महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. Maharashtra Politics

आमदार संजय शिरसाठ

संजय सिरसाठ हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत.

आमदार लता सोनावणे

आमदार लता सोनावणे ह्या चोपडा मतदारसंघातील आमदार आहेत. 2019 साली त्या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या.

आमदार प्रकाश सुर्वे

आमदार प्रकाश सुर्वे हे शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार बालाजी किणीकर

बालाजी किणीकर हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत.

आमदार बालाजी कल्याणकर

बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार अनिल बाबर

अनिल बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार संजय रायमूलकर

संजय रायमूलकर हे मेहेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार रमेश बोरनारे

रमेश बोरनारे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे.

आमदार चिमणराव पाटील

चिमणराव पाटील हे एरोंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आमदार महेश शिंदे

महेश शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.