आजपासून देशभरात दीपोत्सवाला शुरूवात झाली असून राज्यातील काही भागात वातावरणात गारठा जाणवत आहे. दिवाळीच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार हा पाऊस फार मोठा असणार नाही. .पुण्याच्या आयएमडी विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकवर एक पोस्टकरत राज्यातील हवामानाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण, पश्चिम मराहाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह, हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे..Devendra Fadnavis: "भाजप स्वबळावर विधानसभा जिंकू शकत नाही, पण..." निवडणुकीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?.यासोबतच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि परभणी येथे तसेच विदर्भातही आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९ तारखपासून पावसाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून ३० तारखेला हा पाऊस अहिल्यानगर, सातारा, सांगलीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.हवामान विभागाकडून नाशिक आणि कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १ नोव्हेंबरला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळीच्या धामधूमीत पाऊस देखील राज्यात हजेरी लावणार असल्याचें चित्र पाहायला मिळत आहे..Eknath Shinde And Ajit Pawar: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन! अजित पवार बारामती तर एकनाथ शिंदे 'या' मतदारसंघातून भरणार अर्ज.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.