Maharashtra Rain Alert : मुंबईसह, पुण्यात जोरदार पाऊस...राज्याची परिस्थिती काय?, पुन्हा एकदा संकटाचा इशारा

Rain update maharashtra: उद्या हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Rain update
Rain updateesakal
Updated on

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील इतर भागांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कालपासून पावसाची सतत धार सुरू होती, मात्र मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार तर अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट-

उद्या हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

आज (२ ऑगस्ट) कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूरपरिस्थितीची शक्यता-

सातारा जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण कोकण आणि पुणे तसेच नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार झोडपले होते, ज्यामुळे पुणे, कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धरणे १०० टक्के भरल्यामुळे पाणी सोडण्यात आले होते, ज्यामुळे नद्यांना पूर आले आणि जनजीवनावर त्याचा फटका बसला होता.

धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग-

पावसामुळे पवना धरण ९१ टक्के भरले आहे. आमलपट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर खडकवासला धरणातून देखील पाणी सोडण्यात येणार आहे.

Rain update
Eleventh Admission : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावीच्या तब्बल ६७ टक्के जागा रिक्‍त


पावसाच्या अलर्टची यादी

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट):

कोल्हापूर

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट):

रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे
सातारा

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट):

पालघर
ठाणे
मुंबई
नाशिक
वाशीम
यवतमाळ
चंद्रपूर
नागपूर
गडचिरोली

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट):

जालना
परभणी
हिंगोली
नांदेड
बुलडाणा
अकोला
अमरावती
वर्धा
भंडारा
गोंदिया

Rain update
Sakal Podcast: SC-ST च्या उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना ते ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()