मागील काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकणी पूर आल्याच्या घटना देखील घडल्या दरम्यान येत्या काही दिवसात राज्यातील जनतेला पावसापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतकेच नाही तर ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस कोरडे जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील पालघर, ठाणे, घोडबंदर, नाशिक, नंदूरबार, पुणे आणि साताऱ्यातील घाट क्षेत्रात पुढचे दोन ते तीन दिवस मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी असेल. तरी येत्या 24 तासांत मराठवाड्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
आजही येथे पावसाची शक्यता
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, संपूर्ण विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील पाऊस जुलैमधील सरासरीच्या 17 टक्के अतिरिक्त ठरला आहे. मात्र, राज्यभरात पावसाचे प्रमाण असमान असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतानाच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. अनेक ठिकाणी यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण असेच कमी राहिल्यास काही जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.