Latest marathwada Rain update :गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मराठवाड्यात दोन दिवसांपासून पुनरागमन केले असून सोमवारीही ठिकठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन काढणीत शेतकऱ्यांन व्यत्यय येत आहे.
छत्रपती संभाजीनगरात गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. आज सायंकाळी चारच्या सुमारास काही भागात तुरळक पाऊस झाला. जालना शहरात दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्धा तास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. बीड जिल्ह्यात काल दुपारपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली.