Maharashtra Rain Update : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस,ताम्हिणी येथे सर्वाधिक ३०० मिलिमीटर; कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत पूरस्थिती

पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील धरणांत पाण्याचा मोठा येवा सुरू असून काही धरणे भरली आहेत. तर काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
Maharashtra Rain Update : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस,ताम्हिणी येथे सर्वाधिक ३०० मिलिमीटर; कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत पूरस्थिती
Updated on

पुणे : पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील धरणांत पाण्याचा मोठा येवा सुरू असून काही धरणे भरली आहेत. तर काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यामध्ये अलमट्टी, खडकवासला, वडीवळे, गोसी खुर्द, हतनूर, धामणी, बेंबळा, चिल्हेवाडी, बाघ शिरपूर, वारणा या धरणांचा समावेश असून, अनेक धरणांत ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस राहिल्यास उर्वरित धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढण्याची शक्यता आहे. या घाटमाथ्यांवर सर्वाधिक पाऊस पडला.

कोकणातील सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने मुंबई परिसरातही पावसाचा सरी बरसत आहे. तर देहरी, रत्नागिरी, खेडशी मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कोकणातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहे. तसेच मोडकसागर, तासना, विहार ही धरणे ८० टक्केहून अधिक भरली आहेत. तर तुळशी हे धरण शंभर टक्के भरले असून भातसा, धामणी, अप्पर वैतरणा या धरणांतही ५० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. दररोज होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांत पाण्याचा मोठ्या प्रमाणात येवा सुरू असल्याने उर्वरित धरणेही लवकर भरतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पावसामुळे भात लागवडी अंतिम टप्यात आल्या असून हा पाऊस भातासाठी योग्य असल्याने रोपांची वाढही चांगली आहे.

मध्य महाराष्ट्रात जोर कायम

मागील दहा ते बारा दिवसांपासून सुरुवात केलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. तर पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तर कार्ला, लोणावळा मंडलात २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला असून मुळशी, वडीवळे, टेमघर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

जिल्ह्यातील २६ धरणांत बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नव्याने १०.३४ टीएमसी पाण्याचा येवा आलेला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७१.९२ टीएमसी म्हणजेच ३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील वडीवळे आणि खडकवासला धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे खडकवासलातून ७ हजार २७६ क्युसेक, वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदीपात्रामध्ये दोन हजार १७२ क्युसेकने, वारणा धरणातून सद्यःस्थितीत सुरू असलेल्या ३८०० क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्रद्वारद्वारे ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्रमधून १६५८ क्यूसेक असे एकूण ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात संततधार आणि वारणा धरण क्षेत्रात पावसाची अतिवृष्टी, तर इतर भागात मध्यम पाऊस पडत आहे. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राधानगरी, वारणा, कोयना या धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातही पुन्हा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दोन मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून धुळे, जळगाव जिल्ह्यांत हलक्या सरी पडल्या.

यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. यवतमाळमध्ये गेल्या चोवीस तासांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे खुनी नदीचे पातळी वाढली. त्यामुळे मांडवी ते पाटणबोरी या मार्गावर पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. गडचिरोलीतील भामरागड-हेमलकसा (पर्लकोटा) वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असल्याने रस्ते बंद करण्यात आले आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या.

१०० मिलिमीटरहून अधिक पाऊस

कार्ला २९६, लोणावळा २४४.२, शिरगाव २६६, दावडी २४६, अंबोणे २४०, वळवण २१८, डुंगरवाडी १८३, भिरा १८३, वानगाव १६७, देहरी १६३, खोपोली १५४, कोयना १४५, वेल्हा १२७, पानशेत १३२, आंबेगाव १४९, खांड ११०, रत्नागिरी, खेडशी, भिवपुरी १०२, दहादेवडी १६०, पौड, घोटावडे, माले, मुठे १५१, भोलावडे १००, वेळुंजे १००, बामणोली १०७, महाबळेश्‍वर १६३, तापोळा १२३, लामज १५३, बोटोनी १०७, करंजी १०७, आलापल्ली १३१, पेरमिली १०३, कासंसूर ११०, अहेरी १०९.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.