Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुमच्या भागात कशी असेल स्थिती?

Rain Update Maharashtra: पावसाला पूरक स्थितीमुळे शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाच्या मुसळधार सरींनी हजेरी लावली. विदर्भाच्या गडचिरोलीतील सिरोंचा येथे १८७ मिलिमीटर तर रायगडमधील पेणमध्ये १८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Updateesakal
Updated on

पुणे : राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना शनिवारी (ता. १९) मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात येत्या शनिवारी (ता. २०) मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, नांदेड, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असतानाच मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असून राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, गुना, सागर, रायपूर, पुरी ते कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. तर कच्छ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

कोकणात मुसळधार

पावसाला पूरक स्थितीमुळे शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाच्या मुसळधार सरींनी हजेरी लावली. विदर्भाच्या गडचिरोलीतील सिरोंचा येथे १८७ मिलिमीटर तर रायगडमधील पेणमध्ये १८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

कमी दाब क्षेत्र जमिनीवर येणार

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने ओरिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली ओरिसाच्या पुरी पासून ७० किलोमीटर, गोपालपूर व परादीपपासून १३० किलोमीटर आग्नेय दिशेकडे, तर आंध्र प्रदेशच्या कलिंगापट्टमनपासून २४० किलोमीटर ईशान्येकडे होती. ही प्रणाली आज पुरीजवळ जमिनीवर येणार असून, हळूहळू निवळण्याचे संकेत आहेत.

Maharashtra Rain Update
Mumbai Local: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या कुठे? कधी? आणि कसा असणार मेगाब्लॉक!

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट)

रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, भंडारा, गोंदिया

Maharashtra Rain Update
Lok Sabha Working Committee: लोकसभा कामकाज समितीत शिंदे, पवार गटाला स्थान नाही! शिवसेना ठाकरे गटाचा मात्र समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.