मुंबई- पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रविवारपर्यंत राज्यात मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २५ ऑगस्टला दुपारनंतर जोरदार पाऊस पडू शकतो. यासह विजांचा कडकडाट ऐकायला मिळू शकतो. राज्यात २३ ऑगस्ट रोजी अनेक भागात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.
हवमान विभागानुसार, पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर अशा एकूण १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्री न विसरता घराबाहेर पडावे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तुरळक प्रकारचा पाऊस पाहायला मिळू शकतो.