Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला का? वाचा हवामान विभागाने नेमकी काय दिली माहिती

Maharashtra Weather Update News: मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता नाही असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली असं म्हणता येईल.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update sakal
Updated on

Maharashtra Weather News: राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे .राज्याच्या बहुतेक भागांत उघडीप असणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता नाही असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली असं म्हणता येईल.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे उत्तर कोकण, ठाणे, पालघरमध्ये हलक्या सरी पडल्या. अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरात हवामानविषयक कोणतीही प्रणाली सक्रिय नसल्यामुळे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत नाही.

Maharashtra Rain Update
Jalgaon Rain Update: जिल्ह्यातील ‘मान्सून’ला सोमवारपासून लागणार ब्रेक! अतिपावसापासून दिलासा; एक आक्टोबरपासून तापमानात होणार वाढ

हवामानाच्या स्थितीमुळे सध्या पावसाची उघडीप असणार आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने मुंबईला झोडपले होते. तसेच पुण्यामध्ये देखील पावसाचा जोर होता. पण, आता मान्सूनची परतीची वाट धरली आहे. त्यामुळे सध्या पावसाचा जोर ओरसला आहे. काही दिवसातच पाऊस राज्यातून पूर्णपणे माघारी जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update
Marathwada Rain Update: १४४ प्रकल्पांत ८९ टक्के पाणीसाठा, दोनच मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले

देशात कशी असेल पावसाची स्थिती?

राज्यात पाऊस ओसरला असला तरी देशातील अनेक भागांमध्ये पावासाचा जोर कायम असेल. पूर्व उत्तर प्रदेश, ईशान्येकडील राज्ये, तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नेपाळमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. त्यामुळे बिहारला पुराचा धोका आहे. पुराचा फटका बिहारमधील अनेक जिल्ह्यांना बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.