राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज विदर्भ आणि कोकण या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.