Maharashtra Rain Update: संपूर्ण महाराष्ट्रात कसा झाला पाऊस, कोणत्या नद्या ओव्हर फ्लो तर राज्यात कशी आहे स्थिती?

Maharashtra Rain Marathi News : पावसाचा जोर आजही कायम राहिला. पुणे, नगर, सातारा, नाशिक जिल्ह्यांत आज धो-धो पाऊस कोसळला.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Updatesakal
Updated on

राज्यात रविवारी घाटमाथा, मध्य व पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी धरणांतून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली असून काही ठिकाणी नदी किनाऱ्यांवरील घरांमध्ये पाणी शिरले. पुण्यात नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांना पाचारण करण्यात आले.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्यात, विशेषत: मध्य आणि पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरात मागील आठवड्यापासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम राहिला. पुणे, नगर, सातारा, नाशिक जिल्ह्यांत आज धो-धो पाऊस कोसळला.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Updates: पुण्यासह, पालघर अन् साताऱ्याला पाऊस झोडपणार, IMD कडून रेड अलर्ट; वाचा कुठं काय परिस्थिती?

सततच्या पावसामुळे कोकणातील आणि मध्य-पश्‍चिम महाराष्ट्रातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बहुतांश धरणे भरत आली आहेत. त्यामुळे कृष्णा, भीमा खोऱ्यातील धरणांतील विसर्गात वाढ करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना, नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने शनिवारी मध्यरात्री व रविवारी दुपारी पुण्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता.

त्यानुसार, शनिवारी मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. सकाळी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जोराने सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत कोसळत होता. खडकवासला धरणातून विसर्ग सोडल्याने मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. धोक्याचा इशारा असल्याने प्रशासनाने पूरबाधित परिसरातील काही नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केले होते. काही ठिकाणी लष्कर आणि एनडीआरएफचे पथकही तैनात करण्यात आले होते.

मुंबई परिसर आणि सिंधुदुर्गातही पावसाचा जोर होता. कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. तर रायगडमध्ये कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला असला तरी अद्यापही ७७ बंधारे पाण्याखाली आहेत.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

गोदावरीत अभियंता वाहून गेला

नाशिकसह जिल्ह्यात पावसामुळे महत्त्वाची सात धरणे तुडुंब भरली असून शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ८०.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे. रविवारी (ता. ४) दुपारी बारापासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरु झाल्याने गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला. सोमवारी संपूर्ण जिल्ह्यास हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. संततधारेमुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. येथे नीलकंठेश्वर मंदिराजवळ धार्मिक विधी केल्यानंतर पुराचे पाणी पाहताना तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडताच एक तरुण अभियंता दिसेनासा झाला आहे. यग्नेश पवार (वय २९, रा. ओझर, ता. निफाड) असे वाहून गेलेल्या अभियंत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यग्नेश पवार हा भुसावळ येथे महावितरण वीज कंपनीत अभियंता असून, मूळचा ओझर येथील आहे.

Maharashtra Rain Update
Heavy Rain in Maharashtra: पावसाला वैतागलेले गावकरी! ढगांना हार घालत म्हणाले, भावा आमची जिरली आता बास कर...REELS बघा

मराठवाडा, विदर्भात जोर कमी

मागील चार ते पाच दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. विदर्भाच्या पूर्व भागात हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहेत. तर बुलडाण्यातील नरवेल, चांदूरबिस्वा मंडलात मध्यम पाऊस झाला. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने या भागातील नद्या अजूनही भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांतील पाणी पातळी वाढत आहे.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Prediction: आजपासून पुढचे ४ दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार

पावसाचा जोर

- मध्य महाराष्ट्रात धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ

- घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार

- पुणे जिल्ह्यातील धरणांतून पाण्याच्या विसर्ग वाढल्याने गावांना इशारा

- खानदेशात पावसाचा जोर वाढला

- धुळे जिल्ह्यात कान, पांझरा, जामकी नदीवरील प्रकल्प भरले

- पालघरमध्ये सततच्या होणाऱ्या पावसामुळे वैतरणा, पिंजाळ नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

- सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण ९० टक्यांवर भरले

- मराठवाडा, विदर्भात पावसाची उघडीप

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update : राज्यामध्ये सर्वदूर संततधार पाऊस;कोकणात जोरदार, विदर्भात पूरस्थिती,मराठवाड्यात पुनरागमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.