गेल्या दहा बारा दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून आज रोजी राजगड ( वेल्हे) तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान सुरू असून दुर्गम भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगा ,किल्ले तोरणा, राजगड परिसरात मध्ये पाऊस थांबायचे नाव घेतच नसल्याने नाल्यांना ओढ्याचे, ओढ्यांना नदीचे स्वरुप आले आहे.ओढे ,नाले ,नद्यांना आलेल्या पुरात तिरावरील भात पीके पुराच्या पाण्यात बुडाली आहे. वरोती, पासली ,भोरडी ,बालवड नाळवट, केळद, पाल खुर्द, मेटपिलावरे,घिसर, नीवी, कोदापुर, परिसरात भात खाचरांचे बांध वाहुन गेले आहेत.
बालवड येथील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे सर्वात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून बालवड, खोपडेवाडी ,चांदवणे आदी गावांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थ्यांना शाळेतही जाता आले नाही.
नाशिक परिसरात मोठा पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणातून 6000 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. मात्र आज रात्री 8.30 वाजतापासून तो विसर्ग 8000 क्युसेक इतका होईल. सर्व संबंधित यंत्रणांना याची माहिती सिंचन विभागाने दिली असून, सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले
खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पुण्यातील रजपूत वीट भट्टी खिलारेवाडी या ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल आहे. या ठिकाणच्या नागरिकांची व्यवस्था खिलारी शाळेमध्ये करण्यात आली आहे.
जपान,फान्स, जर्मनी आदी युरोप देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची खूपच टंचाई आहे. त्या तुलनेत भारत देशामध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. त्याच हेतूने महाराष्ट्र सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला. या प्रक्रियातून राज्यातील सुमारे चार लाख तरूणांना पुरेशा वेतनावर (महिना दोन लाख) रोजगाराची नामी संधी मिळणार आहे. याशिवाय राज्यात नव्याने अनेक औद्योगिक प्रकल्प उदयास येणार आहेत. या प्राप्त स्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान घेवून यापुढे जगात कोठेही जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणार बैठक आहे.
पुणे सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणारे उजनी धरण सध्या 90 टक्के भरले आहे. उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय सध्या 90 टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या 16 मोऱ्यांद्वारे भीमा नदीपात्रामध्ये आज सायंकाळी 5 वाजता 20000 क्यूसेक्स ने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 95202 क्युसेकने आवक होत आहे. उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाकडून भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील खडकवासला धरणातून 45 हजार कूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर शारदा सोसायटीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. इथे दोन फुट पाणी वाढले असून प्रश्नाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा आवाहन करण्यात आले आहे. मात्र नागरिक बाहेर पडत नसल्याने धोका वाढला आहे. एकता नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी साचलं असून अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे.
मध्य प्रदेशातील सागर येथे झालेल्या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आह.
पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारती समोर असलेला टिळक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाढती पाण्याची पातळी लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या कारणामुळे पूल बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून 5 वाजता पाणी विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्या पार्श्वभमीवर पुणे महापालिकेसमोर असणारा पूल वाहतूक करण्यासाठी बंद करण्यात आला आहे. नदीच्या आजूबाजूच्या भागाला प्रशासनाकडूवन सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
पुण्यातील सिंहगड रोड भागात असणाऱ्या एकता नगर परिसरात आज सकाळपासूनच इंडियन आर्मी म्हणजेच भारतीय लष्कर दलाचे जवान तैनात आहेत. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे एकता नगर भागात पुन्हा एकदा पाणी भरायला आज सकाळपासूनच सुरुवात झाली. याच निमित्ताने नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं मोठं आव्हान या भारतीय लष्करी जवानांनी अतिशय सुरळीतपणे पार पाडलं आहे. लहानांपासून जेष्ठांपर्यंत कुठल्याही जाती धर्म पंथाचा विचार न करता या जवानांनी काळजीपूर्वक या परिसरात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सुरक्षित स्थळावर स्थलांतर केलं.
पुणे शहर परिसर आणि धरण क्षेत्र परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज दुपारच्या सुमारास मुळा-मुठा आणि भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले. मुळा मुठा आणि भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ होत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी उजनी धरणावरून सरकारला सवाल केला आहे. शासनाने या वेळी 10 टक्के सुधारणा केल्या आहेत मान्य केलं पाहिजे पण त्याच ठिकाणी पाणी का साचते हे विचार करण गरजेच आहे. उजनी भरल तर पुढे काय,तर एक दोन महिन्याच प्लॅनिंग हवय आहे.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भूस्खलनात बेपत्ता झालेल्या अर्जुनच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.
पुण्यातील खडकवासला धरणातून संध्याकाळी ५ वाजता 45 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. सध्या पाण्याचा विसर्ग ३५ हजार क्यूसेक्स इतका आहे. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या सततच्या पावसामुळे पाटबंधारे विभागाचा निर्णय आहे. पुण्यातील एकता नगर मधील यंत्रणा सज्ज झाली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथील एका सोसायटीच्या मासिक बैठकीत दरम्यान झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला. सोसायटीच्या मीटिंग दरम्यान झालेल्या वादात एका सभासदाला आपला अंगठाच गमवावा लागला आहे. अध्यक्षा सोबत झालेल्या बाचाबाचीत अध्यक्षाने सभासदाच्या अंगठ्याचा चावा घेतल्यामुळे अंगठा हातापासून वेगळा झाला. हा गंभीर प्रकार दहिसर पश्चिमेकडील मात्रेवाडी अमरनाथ अपार्टमेंट मध्ये घडला आहे. सोसायटीचे सदस्य असलेल्या आदित्य देसाई आणि अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यात वाद झाला या वादात आदित्य देसाई यांचा अंगठा अध्यक्ष नित्यानंद परिवार यांनी चावून हातापासून वेगळा केला आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिकच्या तपास करत आहेत.
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील डेक्कन भागातील बालशिक्षण मंदिर शाळेच्या आत असणारे एक भलेमोठे झाड मुळापासून शाळेची भिंत तोडून कोसळले. सुदैवाने रस्त्यावर कोणीही नसल्याने काहीही जीवित हानी झाली नाही. परंतु २ ,३ गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. अग्निशामन दलाकडून झाड बाजूला केलं जात आहे.
खडकवासल्यातून 36,000 क्युसेक पाणी सोडले जात आहे आणि त्यामुळे सिंहगड रोड, एकता नगरमध्ये पाणी वाढत आहे. 125 लोकांना स्थलांतरित केले आहे. पाणलोट क्षेत्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महापालिका आणि लष्कराचे जवान येथे 8 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे,अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.
कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलयं की, महसूलमंत्री तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. या ट्विटमधून त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली आहे.
भारतीय हवामान खात्याने पुढील ३-४ तासांत नाशिक,पुणे, घाट परिसर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असा संदेश जिल्हा प्रशासनाने पाठवला आहे.
कोथरूडमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, पौड रस्त्यावर, कोथरूड डेपोमध्ये आणि इतर अनेक पाणी साचले आहे. त्यामुळे, नागरिकांची गैरसोय होत आहे.
नागपूर महानगर पालिकेतील समस्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनता दरबार घेत आहेत.
मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपले गाऱ्हाणे तक्रारी मांडण्यासाठी जनता दरबार सहभागी झाले.
विधानसभा निहाय जनतेच्या तक्रारी ऐकल्या जाणार असल्यानं नागपुरातील जनतेने मोठया संख्यने गर्दी केली.
यावेळी एका अधिकाऱ्याला धारेवर धरत, लोकांच्या समस्या सोडवू शकत नसल्यास कारवाईचा इशारा दिला.
नागरिकांचा समस्याकडे लक्ष द्या नाहीतर लक्षात ठेवा अशा शब्दात कामचुकारपणा करणाऱ्यांना सुनावले.
- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस
- नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार गंगापूर धरण 80% भरलं
- थोड्याच वेळात गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करणार
- सुरुवातीला गंगापूर धरणातून 500 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जाणार
- दुपारी तीन वाजेनंतर 1000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता
- रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून मनसेची पुन्हा आक्रमक भूमिका, शासन निर्णयानुसार स्थानिक मुलांना 80% नोकरीत प्राधान्य दिले पाहिजे असा मनसेचा एल्गार.
MIDC मध्ये मराठी मुलांना नोकरी देण्यासाठी मनसेची आक्रमक भूमिका
स्थानिक भूमिपुत्रांना चळवळीत सामील होण्याचं मनसेच आवाहन
भारतीय हवामान खात्याने पुढील ३-४ तासांत नाशिक,पुणे घाट, रायगड, ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असा संदेश जिल्हा प्रशासनाने पाठवला आहे.
मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २४७४५ क्युसेक्स विसर्ग दू. १:०० वा वाढवून २७२८२ क्युसेक्स करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील धोकादायक पूर रेषेच्या आत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असून त्यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी ब्लू लाईनच्या आत राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, स्थलांतरीत नागरिकांसाठी दोन्ही वेळचे जेवण, राहण्याची सोय आणि त्यांना लागणारी मदत उपलब्ध करून देण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आज विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका होणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत मुंबईच्या जागांसंदर्भात मविआच्या वाटाघाटी संदर्भात गठित केलेल्या मुंबई काँग्रेसच्या समितीची सकाळी 10 वाजता बैठक होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता प्रदेश काँग्रेसच्या समितीची राज्यातील जगावाटपसंदर्भात बैठक होणार आहे.
ह्या बैठका मुंबईतील हॉटेल लिलामध्ये होणार असून, यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या जागावाटपासंदर्भात काँग्रेसची तीन सदस्यांची समिती चर्चा करेल, ज्यामध्ये वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर राज्यातील जागावाटपासंदर्भात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज पाटील चर्चा करणार आहेत.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून सकाळी ९.०० वाजता २९ हजार ४१४ क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी-जास्त होऊ शकतो, अशी माहिती उपविभागीय अभियंता, मुठा कालवा पाटबंधारे उपविभाग पुणे यांनी दिली.
पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिराजवळील पवना नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरात पाणी साचले आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
नाशिकच्या रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांमध्ये पूराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून गोदा काठ परिसरातील दुकाने हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
उत्तर प्रदेशातील इटावा येथे काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली. आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. जिथे डबल डेकर बस आणि कारची भीषण टक्कर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख ठरली असून, यासाठी 22 सप्टेंबरला मतदान तर 25 सप्टेंबर मतमोजणी होणार आहे. यातील 10 जागांसाठी अर्ज भरण्यास सहा ऑगस्टपासून सुरूवात होईल.
पुण्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील विविध भागांना झोडपत आहे. आणि पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्याचे हवामान विभागने सांगितले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 4 ऑगस्ट रोजी पुणे, पालघर आणि सातारा जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.