Maharashtra Rain Update : विदर्भ-मराठवाड्यासह राज्यात पाऊस कधी परतणार? IMD ने जारी केला अलर्ट, जाणून घ्या अपडेट्स

Weather update
Weather update Sakal Digital
Updated on

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या सर्वांच्या नजरा या आकाशाकडे लागल्या असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी सरसरी ८९ टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

तसेच राज्यातील प्रमुख धरणात पाण्याची पातळी देखील मागील वर्षीपेक्षा कमी असल्याने देखील चिंतेत भर पडली आहे. मागील वर्षी याच कालावधीदरम्यान ८०.९० टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या मात्र पाणीसाठा ६१ टक्के इतका आहे. त्यामुळे पाऊस कधी परतणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज जारी केला आहे.

मराठवाडा आणि विदर्भासाठी यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने पुढील चार दिवस राज्यात पावसाच्या स्थितीबाबत इशारा दिला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे १९ ऑगस्ट म्हणजेच आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगावसह विदर्भातील इतर जिल्हे आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

१९ ऑगस्ट रोजी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि अहमदनगर आणि सोलापूर वगळता सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यांच्यासह पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि रत्नागिरी या भागात देखील उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Weather update
Cabinet Meeting : महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द; गौरी-गणपतीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा; शिंदे सरकारचा निर्णय

विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल

विदर्भातील सर्व जिल्ह्यांना २० ऑगस्टला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ आणि २२ ऑगस्ट रोजी कोकणातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मॉन्सूनचा ब्रेक संपणार

पूर्व भारतात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मॉन्सूनचा ब्रेक संपणार आहे. पुढील आठवड्यात हिमालयाच्या पायथ्याजवळ मॉन्सून पुन्हा सक्रिय होईल. ऑगस्टअखेरपर्यंत मॉन्सूनचा पाऊस पडेल. त्या काळात मध्य भारतात पावसाचे प्रमाण कमी असेल, असे हवामान तज्ज्ञ अक्षय देवरस यांनी म्हटले आहे.

Weather update
Central Govt Employees: 'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेआधी मिळणार पगार, काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()