Maharashtra Weather Update: पाऊस घालणार 11 राज्यात धुमाकूळ, महाराष्ट्रात कशी असणार परिस्थिती?

Maharashtra Rain Update: यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 2024 मध्ये ताम्हिणी घाट परिसरात तब्बल 9,644 मिमी इतका पाऊस पडला आहे.
Maharashtra weather update: Thunderstorms expected in Mumbai today
Maharashtra Rain And Weather NewsEsakal
Updated on

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने हळूहळू परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे दिल्लीसह काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. अशा परिस्थितीत ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

पुढील ७ दिवसांत केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासह कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि रायलसीमा येथे ८ ऑक्टोबरपर्यंत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

आज महाराष्ट्राचे हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळ येण्याची शक्यता आहे.

मुंबईत, कमाल तापमाण 93°F आणि किमान तापमान 77°F राहण्याची शक्यता आहे. यासह, सकाळी पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. वातावरण बहुतेक ढगाळ राहणार असून वारा 5 मैल प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांमधील तापमानाचा आढावा

- छत्रपती संभाजीनगर: 23.4°C

- कोल्हापूर: हलक्या वाऱ्यासह 21.9°C

- महाबळेश्वर: 18.1°C

- पुणे: 22.4°C

- नांदेड: 24.°C

एकूणच, सकाळच्या सत्रात राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींसह, संपूर्ण दिवस उष्ण आणि दमट असणार आहे.

Maharashtra weather update: Thunderstorms expected in Mumbai today
Sanjay Rathod Accident: शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांच्या वाहनाने धडक दिली अन् टेम्पो जाग्यावर झाला पलटी; अपघातानंतर मंत्र्याच्या गाडीची नंबरप्लेट काढली तोडून

ताम्हिणीत विक्रमी पाऊस

यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 2024 मध्ये ताम्हिणी घाट परिसरात तब्बल 9,644 मिमी इतका पाऊस पडला आहे.

यावेळी ताम्हिणी घाटातील पावसाने दरवर्षा सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या मेघालयातील चेरापुंजीलाही मागे टाकले आहे. असे भारताच्या हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra weather update: Thunderstorms expected in Mumbai today
Ashok Tanwar: अवघड हाय समदं! कोण आहे 'तो' नेता? भाजपसाठी 2 वाजता प्रचार केला अन् 2:55 ला राहुल गांधींच्या उपस्थितीत मारली काँग्रेसमध्ये उडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.