Maharashtra Rains: रायगडच्या पूरपरिस्थितीवर अमित शाहांचे ट्वीट

Maharashtra Rains: रायगडच्या पूरपरिस्थितीवर अमित शाहांचे ट्वीट दोन दिवसांपासून तुफान पाऊस; विविध दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी Maharashtra Rains Amit Shah Tweets about Raigad Talai Landslide many lost lives vjb 91
Amit-Shah-Mahad
Amit-Shah-Mahad
Updated on

नवी दिल्ली: राज्यातील पावसाने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात हाहा:कार माजला असून विविध दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी गेल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पूराची स्थिती उद्भवल्याने अनेक जण आपापल्या घरात अडकले आहेत. अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली असल्याने आपल्या घराच्या किंवा इमारतीच्या छतावर येऊन थांबा आणि बचाव पथकाच्या हेलिकॉप्टरकडे मदत मागा अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच, मुंबईहून NDRF आणि नौदलाचे डायव्हर तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या परिस्थितीची दखल घेत ट्वीट केले.

Amit-Shah-Mahad
रायगड: तळई दरड दुर्घटनेत एकूण 44 जणांचा बळी; बचाव कार्य सुरुच

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याने जी दुर्घटना घडली आहे ती अत्यंत दु:खद आहेत. या संदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि NDRF चे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संवाद साधला आहे. NDRF चे पथक मदत आणि बचावकार्य करत आहे. केंद्र सरकार लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ती मदत करत आहे, असे ट्वीट करत त्यांनी रायगडच्या पूरपरिस्थितीची दखल घेतली आणि महत्त्वाची माहिती दिली.

Amit-Shah-Mahad
"मुख्यमंत्री महोदय, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची आता खरी गरज"

दरम्यान, तळई गावात दरड कोसळून 32 जणांना मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. महाड तालुक्यातील नाते रोडवरील तळई गावात दरड कोसळली. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 32 घरांवर ही दरड कोसळली असून त्यात 72 जण बेपत्ता असल्याची माहिती होती. त्यातच, सध्याच्या माहितीनुसार या दुर्घटनेत 32 जणांना मृत्यू झाल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.