Red Alert For Maharashtra: सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला पावसाने धुतले, राज्यातील 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

IMD weather forecast : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक भागांत संततधार पाऊस सुरू आहे. IMD ने आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Maharashtra Rains Red Alert
Maharashtra Rains Red AlertEsakal
Updated on

गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशीही राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) आज पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे तर, इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक भागांत संततधार पाऊस सुरू आहे. IMD ने आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

रायगड, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्याच्या घाटांवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

Maharashtra Rains Red Alert
Viral Video: अटल सेतूवर कार थांबवली, कठड्याजवळ गेला अन्...घरी 5 वर्षांची मुलगी, अभियंत्याने जीवन का संपवलं?

उत्तर कोकण आणि लगतच्या घाट परिसरात गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये झालेला पाऊस आणि सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर पाहता परिसरात दरडी कोसळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे दरडप्रवण क्षेत्रांतील नागरिकांनी पुढील ४८ तास सावध राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rains Red Alert
Pune Heavy Rain Photos: पुण्यात रात्रभर नॉनस्टॉप धो-धो कोसळला, पावसाचे भयानक दृश्य कॅमेरात कैद! हैराण करणारे फोटो पाहा

ठाणे आणि पालघरमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ठाणे, रायगड, पालघरसाठी गुरुवार (25 जुलै) साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत गुरुवारी मध्यम ते जोरदार पाऊस असेल. 25 जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट (अत्यंत मुसळधार पाऊस) जारी करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com