मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढत होत आहे. राज्यात रविवारी (ता.२६) कोरोनाचे ६ हजार ४९३ नवीन प्रकरणांची नोंद झाली. दुसरीकडे शनिवारी ४ हजार २०५ नवीन रुग्ण आढळले. या व्यतिरिक्त रविवारी ५ कोरोनाच्या (Corona) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या सक्रिया रुग्णसंख्या वाढून २४ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच एक दिलाशाची बातमी आहे, की ६ हजार २१३ संक्रमित कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. (Maharashtra Registered Above 6 Thousand New Covid Cases On 26th June)
राज्यात नवीन व्हेरिएंटचे पाच रुग्ण
पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार, रविवारी राज्यात B.A.4 चे २ आणि B.A.5 चे तीन नवीन रुग्ण आढळले आहे. नवीन व्हेरिएंटचे रुग्ण हे मुंबईतील (Mumbai) रहिवासी आहेत. त्यांचे सॅम्पल कलेक्शन १० ते २० जूनच्या दरम्यान करण्यात आले होते. यात ०-१८ वयोगटातील एक, २६-५० वयोगटातील ३ आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एका रुग्णाचा समावेश आहे. या पाच रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत. आता राज्यात B.A.4 आणि B.A.5 चे एकूण रुग्णांची संख्या वाढून ५४ वर पोहोचली आहे. यात पुणे १५ रुग्ण, मुंबई ३३, नागपूर ४ आणि ठाण्याचे २ रुग्णांचा समावेश आहे. (Maharashtra Covid Update)
उपचाराधीन रग्णांची संख्या २४ हजारांच्या पुढे
आता राज्यात कोरोनाची उपचाराधीन रुग्णसंख्या वाढून २४ हजार ६०८ वर पोहोचली आहे. सर्वात जास्त उपचाराधीन प्रकरणे मुंबईत १२ हजार ७२७ आणि पुन्हा ठाण्यात ५ हजार ३०१ उपचाराधीन प्रकरणे आहेत. महाराष्ट्रात रिकव्हरी रेट ९७.८३ टक्के आहे. राज्यात आता एकूण ७७ लाख ९० हजार १५३ लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.