Maharashtra Covid Update: आजची आकडेवारी चिंता वाढवणारी; नागरिकांना काळजीचं आवाहन

राज्यात गेल्या चोवीस तासांत हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.
Coronavirus News in India | Covid-19 Patient Updates
Coronavirus News in India | Covid-19 Patient Updatesesakal
Updated on

मुंबई : राज्यात गेल्या चोवीस तासांत हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले असून मृतांची संख्याही वाढली आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंतेत भर पडली असून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं याबाबत माहिती दिली आहे. (Maharashtra reports 1115 new COVID19 cases 560 recoveries 9 deaths in the last 24 hours)

शासनाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात १११५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५६० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ५४२१ झाली आहे.

Coronavirus News in India | Covid-19 Patient Updates
Kalicharan Hate Speech: कालिचरणला चिथावणीखोर भाषण भोवलं! नांदेडमध्ये गुन्हा दाखल

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.११ टक्के असून मृत्यूचा दर १.८२ टक्के आहे. तसेच राज्यातील बडी शहरं असलेल्या मुंबई, पुणे आणि नागपूर इथल्या विमानतळांवर परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची स्क्रीनिंग केलं जात आहे. या सर्वांचं थर्मल स्कॅनिंग केलं जात असून यांपैकी २ टक्के प्रवाशांची रँडमली कोविड चाचणीही केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.