नागपुरात BA.5 चे दोन रूग्ण; तर, राज्यात 4,255 बाधित

राज्यातील सक्रीय रूग्णांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा पार केला आहे.
corona Update
corona Updatesakal
Updated on

मुंबई : राज्यातील नव्या कोरोना बाधितांची आकडेवारी काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली असून, गेल्या 24 तासांत राज्यात आजही नव्या कोरोना बाधितांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज 4,255 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे. एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी 4,024 बाधितांची नोंद करण्यात आली होती. (Maharashtra Corona Update)

दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासात 2,879 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.87 टक्क्यांवर नोंदवण्यात आले आहे. तर मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 20,634 इतक्या सक्रीय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईने वाढवली राज्याची चिंता

एकीकडे राज्यातील सक्रीय रूग्णांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा पार केला असून, यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत नोंदवण्यात आले आहे. मुंबईत सध्या 17,005 रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईने राज्याच्या चिंतेत भर टाकली आहे. मुंबईत आज 2366 नवे कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (Mumbai Corona Active Cases)

corona Update
पार्टी करून बिल देत नाहीत, हॉटेल मालकाने अडवला सदाभाऊंचा ताफा

नागपुरात BA.5 व्हेरीयंटचे 2 रुग्ण

नागपूरमध्ये आज कोरोनाच्या BA. 5 व्हेरियंटचे दोन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. या दोघांचेही लसीकरण झालेले असून हे दोन्ही रुग्ण होम आयसोलेशनमध्ये बरे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.