Ambedkar Jayanti 2023: मोठी दुर्घटना, रॅलीदरम्यान विजेचा शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू

मुंबई येथील विरारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.
Ambedkar Jayanti 2023 Virar Palghar Two died due to electric shock during the rally
Ambedkar Jayanti 2023 Virar Palghar Two died due to electric shock during the rally
Updated on

देशासह राज्यभरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई येथील विरारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रॅलीदरम्यान विजेचा शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्या धक्कादायक माहिती समोर आली आहे.(Ambedkar Jayanti 2023 Virar Palghar Two died due to electric shock during the rally )

मुंबईजवळलागून असलेल्याविरार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान भीषण अपघात झाला. रॅलीदरम्यान विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

झोनल डीसीपी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रॅली संपल्यानंतर मनवेलपाडा भागातून कारगिल अनुयायी जात असताना हा संपूर्ण प्रकार घडला. रॅलीमध्ये रथावरील ध्वज विजेच्या तारेला लागला. त्यातून करंट पास झाला आणि रथ ढकलणाऱ्या लोकांना विजेचा शॉक लागला.

कागगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील ६ जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला .

तर ४ जण जखमी झाले. त्यातील उमेश कनोजिया (१८). राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३) ३ गंभीर जखमींना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्मित कांबळे (३२) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

विजेच्या धक्क्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रॅलीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.