ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 मध्ये वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. शिवराज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापन सोहळा सांस्कृतिक विभाग शिवराज्यभिषेक महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.
मुंबई - ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 मध्ये वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. शिवराज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापन सोहळा सांस्कृतिक विभाग शिवराज्यभिषेक महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. यापुर्वी अर्थमंत्री असताना मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावर सामान्यांच्या कल्पना मागवल्या होत्या.
यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी एक पत्र राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, महापौर, नगराध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी पदाधिकारी आदींना पाठविले आहे.
पत्रात काय आवाहन
बलाढ्य मोगल सत्तेशी युक्ती आणि बुद्धीने लढत महाराजांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला.ही घटना केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण बाब होती. या क्षणाने महाराज छत्रपती झाले व महाराजांच्या दिग्विजयाची आणि मराठा साम्राज्याची ख्याती सर्वत्र निनादू लागली.
सन २०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण होत आहे. २ जून ते २० जून २०२४ या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येईल. हा महोस्तव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी सूचना कळवाव्यात असे मुनगंटीवार यांनी या पत्रात म्हटले आहे. min.culture@maharashtra.gov.in यावर सूचना पाठविल्यास त्याचा विचार करण्यात येईल असेही आवाहन त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.