मुंबई : राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांनी गेल्या ४८ तासांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एसटी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात ६५०० रुपयांची घसघशीत वाढही करण्यात आली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच हा संप पुकारण्यात आल्यानं गावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.