एसटी महामंडळाच्या गाड्या राज्यात सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे प्रमुख साधन आहेत. दररोज लाखो लोक एसटी बसने प्रवास करत असतात. दरम्यान प्रवाशी सातत्याने एसटी बसच्या दुर्दशेबद्दल बोलत असतात. याविरोधात आवाज उठवत असतात. इतकेच काय तर एसटीच्या गैर सोयीमुळे अनेक प्रवाशांनी खाजगी बससेवेकडे आपला मोर्चा वळवला आहे.
अशात आता एका एसटी बसचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे एका विद्यार्थ्याने केलेल्या गैरप्रकारामुळे एसटी बसचाही पर्दाफाश झाला आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक शाळकरू विद्यार्थी एसटीमध्ये जागा पकडण्यासाठी खिडकीतून आज जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. सुरवातील हा विद्यार्थी उडी मारून खिडकी पकडतो आणि जसे त्याचे पाय खिडकीच्या आता जातात तशी ती खिडकी खाली पडते. यावेळी खिडकीसह विद्यार्थीही जोरदारपणे खाली पडल्याचे पाहायला मिळते.
यावेळी या युजरने पोस्टला, "प्रवाशाला धडा मिळाला म्हणून खुश व्हावं की एसटीची काच पडली म्हणून दुःखी!" असं कॅप्शन दिले आहे.
दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे हे स्पष्ट झाले नाही. मात्र, व्हिडिओत ऐकू येणारी मराठी भाषा आणि बसच्या रंगावरून ही घटना मराष्टातील असल्याचे लक्षात येते.
हा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील एसटी बसच्या दुरावस्थेचा आणि ग्रामीण भागातील खऱ्या परिस्थितीचे चित्र समोर आले आहे. राज्यातील अनेक भागांत आजही एसटी गाड्या वेळेवर पोहचत नाहीत. अपुऱ्या गाडांमुळे अनेकदा प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामाऱ्या होत असल्याचे समोर येत असते. इतकेच नव्हे तर प्रवाशांची वाहक आणि चालकांशीही मोठ्या प्रमाणावर भांडणे होताना आपण पाहिले असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.