Maharashtra Budget 2024: आजच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Interim Assembly Budget 2024 LIVE: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणारे हे पावसाळी अधिवेशन गदारोळाचे ठरले. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने विरोधक उत्साहात आहेत.
Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024Sakal
Updated on

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात इतिहास करणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलंं अर्थसंकल्पाचं काैतुक

  • आज अजित पवार यांच अभिनंदन करतो. सर्वसमावेशक अस बजेट आज मांडलं.

  • शेतकरी, महिला, युवा, मागसवर्गीय, सर्व घटकांना समर्पित असा अर्थसंकल्प आहे.

  • उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे पण हा माय बापांचा अर्थसंकल्प आहे.

  • आता विरोधीपक्ष बोलत होते. त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता. चेहरे उतरलेले होते केवळ टिका करत होते.

  • हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात इतिहास करणार आहे.

  • जे जे कबूल केल आहे ती प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करुन दाखवून

  • हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे निवडणुकीचा नाही

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: चादर फाटली म्हणून घोषणांचा पाऊस; जयंत पाटलांची सरकारवर टीका

जयंत पाटल काय म्हणाले?

  • बेजबाबदारपणे मांडले गेलेलं बजेट

  • पराभवातून वाचण्यासाठी शेवटचा प्रयत्न

  • महिलांना बजेटमधून काहीही मिळणार नाही

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये सवलत

मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित 8 लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती. या निर्णयाचा अंदाजे 2 लाख 5 हजार 499 मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: "शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह" योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये

  • "शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह" योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये

  • राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये

  • रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी 3 हजार 324 रुग्णवाहिका

  • जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प

  • मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 2 हजार 567 ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे.

  • जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन 12 किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविला, कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे प्रस्तावही पाठविण्यात येणार

  • शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करणार

  • वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: नागपूर जिल्ह्यातील रामटेक विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्यात 211कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार

  • सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 381 कोटी 56 लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर

  • कल्याण-नगर मार्ग माळशेज घाटात सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक व्ह्युईंग गॅलरी उभारण्यात येणार

  • नागपूर जिल्ह्यातील रामटेक विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्यात 211कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार

  • अध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक बाबा जुमदेवजी यांचे स्मारकासाठी पावडदौना, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथे 77 कोटी रुपये किंमतीचा विकास आराखडा तयार करणार

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांची वीज माफ होणार

  • शेती कृषी पंपाचा बिल माफ करण्याचा निर्णय

  • माळशेज घाटात व्हीव्हींग गँलरी उभारण्यात येईल

  • राज्याची राजकोषिय तूट 1 लाख 10 हजार कोटी आहे

  • इंधनावरचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्क्यांवर केला

  • एम एम आर भागात हा दर कमी केला

  • त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणा

Maharashtra Budget 2024 LIVE: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू करणार

राज्यातल्या १५ लाख महिला लखपती दीदी झाल्या असून चालू आर्थिक वर्षात २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू करणार. नवी मुंबईमध्ये युनिटी मॉल बांधण्यात येणार

Maharashtra Budget 2024 LIVE: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर

  • विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी 10 लाख युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर.

  • या अंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थीला दरमहा 10 हजार रुपये विद्या वेतन देणार.

Maharashtra Budget 2024 LIVE: प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये मिळणार

राज्य सरकारने प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी भरपाई वाढवली आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना पुढील 20 लाख रुपयांऐवजी नातेवाईकांना 25 लाख रुपये मिळतील.

Maharashtra Budget 2024 LIVE: संजय गांधी निराधार योजनेत 500 रुपयांची वाढ

  • सिंधुदुर्ग स्कूबा डायविंग केंद्र बनवणार

  • संजय गांधी निराधार योजनेत 500 रुपयांची वाढ

  • आता 1,500 रुपये मिळणार

Maharashtra Budget 2024 LIVE: 3,200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार

  • येत्या दोन वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होतील

  • सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून 15000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेला आहे

  • ⁠3,200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे

  • ⁠शेतकरी यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी 15,,000 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येत आहे

Maharashtra Budget 2024 LIVE: गाईच्या दुधासाठी 5 रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय

  • गाईच्या दुधासाठी 5 रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय

  • 1 जुलैपासून अनुदान दिले जाणार

  • कापूस, सोयाबिन उत्पादकांना 5 हजारांचं हेक्टरी अनुदान

  • 5 हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिलं जाईल

Maharashtra Budget 2024 LIVE: मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना

  • कृषी पंपांना मोफत वीज

  • लाभार्थी- 7.5 एचपी मोटर असलेल्या लहान, मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल.

  • 44 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

  • 8.5 लाख शेतकऱ्यांना सौरपंप दिले जाणार आहेत.

  • एकूण 52 लाख 50 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

Maharashtra Budget 2024 LIVE: गाव तिथे गोदाम योजना राबवणार- अजित पवार

  • गाव तिथे गोदाम योजना राबवणार

  • शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा मिळणार

  • कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना फायदा होणार

Maharashtra Budget 2024 Live: व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांसाठी मोठी घोषणा

  • व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना 8 लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबियातल्या मुलींना 100 टक्के फी भरण्याचा निर्णय

  • नमो शेतकरी योजनेचा 92 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला

Maharashtra Budget 2024 Live: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा; वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार

प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची मी घोषणा करत आहे.

Maharashtra Budget 2024 Live: मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय

मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला

Maharashtra Budget 2024 Live: 21 ते 60 वर्षाच्या महिलांना 1,500रुपये दिले जातील

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेनुसार 21 ते 60 वर्षाच्या महिलांना 1,500रुपये दिले जातील

  • त्यासाठी 46,000 कोटी रुपये लागतील

  • राज्यात महिलांना 10 हजार पिंक रिक्षा देण्यात येईल

Maharashtra Assembly Budget 2024 Live: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर

महत्त्वाचे मुद्दे कोणते?

  • 1994ला महिला धोरण जाहीर झाले

  • महिलांसाठी सरकारनं विविध योजना आ‌णल्या

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर

Maharashtra Assembly Budget 2024 Live: लाडकी बहीण या योजनेचं आम्ही स्वागत करतो; उद्धव ठाकरे यांचा योजनेला पाठिंबा

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

  • गुजरात महाराष्ट्राच्या पुढे जातो. महाराष्ट्राची लूट केली जात आहे

  • येत्या 2-3 महिन्यात महाराष्ट्राचील जनता त्यांना आरसा दाखवेल

  • शेतकर्याची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांचे विज बील माफ कराव

  • हे डबल इंजिन सरकार आहे… इतर डबे जोडले जात आहेत

  • लाडकी बहीण या योजनेच आम्ही स्वागत करतो

  • महिला पुरुषांमध्ये भेद न करता लाडका भाऊ किंवा मुलगा अशीही योजना असावी

Maharashtra Budget 2024 Live: आईस्क्रीम प्रकरण विधानसभेत गाजलं

अतुल भातखळकर काय म्हणाले?

एका डॉक्टरने आईस्क्रीम मागितली आणि त्या आईस्क्रीममध्ये बोट मिळाले ही गंभीर घटना आहे. त्यामुळं पूर्ण आईस्क्रीमचा बॅच रद्द करायची गरज होती, पण ती झालेली दिसत नाही. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का?

कंपनीने आधी दखल घेतली नाही. ज्यावेळेस पोलिसांनी एफआयआर दाखल केली त्यावेळेस दखल घेतली. अशा पद्धतीने कंपनीचा पूर्ण स्टाफला आणि जनरल मॅनेजवरही कारवाई करायची गरज आहे. लायसन्स सुद्धा रद्द करण्याची गरज आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले उत्तर

  • आपण या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे

  • त्याचबरोबर संबंधित गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जात आहे

  • कंपनीच्या परवाना बाबत केंद्राचा अधिकार आहे

Maharashtra Budget 2024 Live: मुंबई-गोवा महामार्गावरून सत्ताधारी विरोधक यांच्यात जुंपली, विधानपरिषदेचं कामकाज २ वाजेपर्यंत केलं तहकूब

मुंबई-गोवा महामार्गावरून सत्ताधारी विरोधक यांच्यात जुंपली. त्यानंतर विधानपरिषदेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

Maharashtra Budget 2024 Live: विधान भवनाबाहेर दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; दूध ओतून आंदोलन सुरु, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात

विधान भवनाबाहेर दूध उत्पादक शेतकरी आक्रमकझाले. त्यांना यावेळी विधान भवनाबाहेर दूध ओतून आंदोलन सुरु केलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Maharashtra Assembly Budget 2024 Live: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेसाठी 10 नावे केंद्राकडे पाठवली

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी 10 नावे केंद्राकडे पाठवण्यात आले आहेत. यावर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता. भाजप कडून पाच उमेदवार दिले जाऊ शकतात. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जातीचे समीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न.

विधानपरिषदेसाठी 10 नावे कोणती?

  • पंकजा मुंडे

  • अमित गोरखे

  • परिणय फुके

  • सुधाकर कोहळे

  • योगेश टिळेकर

  • निलय नाईक

  • हर्षवर्धन पाटील

  • रावसाहेब दानवे

  • चित्रा वाघ

  • माधवीताई नाईक

Maharashtra Budget Live: विधान भवनाबाहेर दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; दूध ओतून आंदोलन सुरु

  • राज्यात दूध उत्पादक आक्रमक

  • दूध पावडर आयात करण्याविरोधात

  • किमान 40 रुपये दूध दरवाढ द्यावी ही मागणी

Maharashtra Assembly Budget 2024 Live: राज्यात युरिया खताचा होतोय काळाबाजार; कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली कबुली

  • युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची कृषी मंत्र्यांची कबुली

  • लेखी उत्तरात कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली कबुली

  • अनुदानित युरियाचा काळाबाजार झाल्याची मुंडे यांची लेखी उत्तरात माहिती

  • सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलिसांकडून याबाबत तपास सुरु

Maharashtra Budget 2024 LIVE: अडीच वर्षात जनतेला आश्वासनांचे गाजर दिले; शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांची सरकारवर टीका

शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा काय म्हणाले?

  • अर्थमंत्री आज बजेट सादर करणार आहेत

  • मागील अडीच वर्षात जनतेला आश्वासनांचे गाजर देण्याचे काम केले आहे

  • शेतकरी 50 हजार अनुदान असेल किंवा इतर कुठलेच मुद्दे सोडवले नाहीत

  • निवडणुकीच्या निमित्ताने हे बजेट सादर होत आहे

Maharashtra Budget Live 2024: मुख्यमंत्री जनतेसाठी पुढील योजना जाहीर करू शकतात

1) अन्नपूर्णा योजना- दरवर्षी तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत सर्व महिला पात्र

2) मुख्यंमंत्री बळीराजा वीज सवलत योजना

3) कृषी पंपांना विनामुल्य वीज - ७.५ एचपी मोटर्स आहे त्या सर्व छोट्या मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज देणार.

4) 40 लाख हून अधीक शेतकऱ्यांना फायदा होईल.

5) ८ लाखाहून शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचा विचार.

6) एकूण 50 लाखाहून अधीक शेतकरी लाभार्थी ठरतील

Maharashtra Budget Live 2024: राज्यातील युवकांसाठी कोणत्या योजना असतील? 

  • राज्यातील युवकांसाठी योजना

  • मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना

  • १२ वी पास युवक पात्र

  • ७००० रुपये - वार्षिक

  • आयटीआय डिप्लोमा - ८००० रुपये

  • पदविधर - ९००० रुपये

  • १८ ते २९ वर्षे वयोगट दरम्यान

  • अंदाज़े लाभार्थी ठरतील

Maharashtra Budget Live 2024: अर्थसंकल्पात काय असू शकते?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

  • उद्देश - आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणि जीवनमान सुघारण्यासाठी

  • लाभार्थी - २१ ते ६० वयोगटातील महिला

  • वार्षिक २,५०,००० प्रेक्षा कमी उत्पन्न असलेले पात्र ठरणार.

  • सुमारे - ३ कोटी हून अधीक महिलांना लाभ अपेक्षित

  • प्रत्येक लाभार्थ्यांना दरमहा - १५०० रुपये मिळणार.

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणारे हे पावसाळी अधिवेशन गदारोळाचे ठरले. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने विरोधक उत्साहात होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात लोकाभिमुख घोषणा केल्या आहेत.

अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्याक कल्याण आणि शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. दुसरीकडे, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पेपरफुटी, ओबीसी आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष महाविकास आघाडीने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या फेब्रुवारीत अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांना खूश करणारा निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर केला, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या मोठ्या घोषणा केल्या ते जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.