Sanjay Rathod: संजय राठोड पुन्हा अडचणीत; CM शिंदे कारवाई करणार का?

मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार
Sanjay Rathod Eknath Shinde
Sanjay Rathod Eknath ShindeSakal
Updated on

महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहण्यात आलं आहे. यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन करून बंद पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री आणि त्यांचं कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टालय असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त, तणावग्रस्त झाल्याचे या पत्रामध्ये म्हटलं आहे.

Sanjay Rathod Eknath Shinde
Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा फायनान्सर CBIच्या जाळ्यात, सिंगापूरवरून होतंय प्रत्यार्पण

राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमीत केल्या जातात. मात्र औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधानाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटींकरता प्रशासनाद्वारे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरता निलंबित करणे अथवा कायमस्वरुपी रद्द करणे, अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचे संघटनेने या पत्रामध्ये म्हटलं आहे.

Sanjay Rathod Eknath Shinde
Accident News: विहीर खोदताना दुर्दैवी घटना! स्फोटकांचा स्फोट होऊन 3 जणांचा मृत्यू

शिवाय अनेक छोट्या मोठ्या त्रुटींसाठी औषध विकेत्यांना आवाजवी शिक्षा केली जात असल्याचं पत्रात म्हटलं आहे. तर औषध विक्रेत्यांना मंत्र्यांचे पीएस, ओएसडी यांच्यावर प्रचंड पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार सुद्धा या पत्रात करण्यात आली आहे.

या संदर्भात यापूर्वीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री यांना भेटून या तक्रारी केल्यानंतरसुद्धा भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढला असल्याचं दिसुन येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही तर राज्य संघटना आंदोलन करेल तर त्याच्या परिणामाला सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

Sanjay Rathod Eknath Shinde
Fire Accident: चीनमध्ये मोठी दुर्घटना; रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.