राज्यातील महाविद्यालयांबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

कोरोनाच्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Students
Studentssakal
Updated on

मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्याच्याशी संलग्नित महाविद्यालय, अभिमत विद्यापीठ स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्गही आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने 1 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. यासाठीचा शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आज जारी केला आहे. (Maharashtra Government Give Permission To Reopen Colleges In State From 1St Feb) यापूर्वी राज्यात कोविड आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने 7 जानेवारीपासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे त्याच्याशी संलग्नित महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, रूग्णसंख्या घटल्याने आता पुन्हा महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Students
पंजाबमधील जुळ्या सोहना-मोहनाला मिळाले स्वतंत्र मतदार कार्ड

विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालये ही ज्या आयुक्त महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अंतर्गत येतात, त्यांच्याशी कोविड-१९ च्या (Covid 19 Protocol) आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती प्रतिबंधित प्रक्षेत्राचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घ्याव्यात, त्यानंतरच विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरु करण्याबाबत संबधित प्राधिकरणाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा. त्यानुसार महाविद्यालयांना ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना, एसओपीमध्ये (SOPs) देण्यात यावी असे विभागाने म्हटले आहे. (Mahrashtra Collages Latest News In Marathi )

Students
Survey : देशात मतदानाबाबत मत बदललं; 86 टक्के लोक म्हणतात...

डोस पूर्ण नसल्यास ऑनलाइन शिक्षण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात येणारे लसींचे दोन्ही (Covid 19 Vaccination For Student) डोस घेतलेले आहेत, अशा विद्यार्थी, विद्यार्थीनांना विद्यापीठ आणि महाविद्यालयांत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहणारआहे, तर दोन्ही (Covid Vaccination) डोस न झालेल्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात (College) उपस्थित राहता येणार नाही, त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे. (Online Study)

Students
ऑनलाईन परिक्षा घेताना प्राध्यापकांचाच गोंधळ; चुका टाळण्यासाठी दिलं प्राध्यापकांना ट्रेनिंग 

15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाइन

विद्यापीठे,महाविद्यालयाच्या (College University Exam) 15फेब्रुवारी पर्यंत असलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन (Online Exam) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत, मात्र त्यानंतर सर्व परीक्षा या स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ऑफलाईन आणि ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्याच्या स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विद्यार्थी अथवा त्याचे कुटुंबीय कोरोना बाधित असल्यास किंवा आरोग्यविषयक इतर समस्यामुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर, अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन,ऑफलाईन पध्दतीने पूर्नपरिक्षा घेतली जाणार आहे. त्यामूळे या काळात परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

अशा आहेत मार्गदर्शक सूचना

  • परीक्षेच्या काळात विद्यार्थ्याना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंका याचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयानी हेल्पलाईनची व्यवस्था करावी.

  • परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच हेल्पलाइन नंबर इत्यादी स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध करुन द्यावी.

  • वसतीगृहे टप्याटप्याने सुरु करण्याबाबत संबंधित विद्यापीठ, संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे व संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनीआढावा घेऊन व स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करून त्याचे स्तरावर निर्णय घ्यावा.

  • ज्या विद्यार्थ्यांनीनी कोव्हिन-१९ ची लस घेतलेली नाही. त्याच्याकरिता विशेष मोहीम महाविद्यालयाने विद्यापीठांमध्ये आयोजित केली जावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()