Kho-Kho: महाराष्ट्र राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात पुणे, तर महिला गटात ठाण्याने मारली बाजी

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेमध्ये पुण्याच्या संघांना संमिश्र यशाचा सामना करावा लागला.
Kho-Kho: महाराष्ट्र राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात पुणे, तर महिला गटात ठाण्याने मारली बाजी
Sakal
Updated on

State Level Kho-Kho:महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेमध्ये पुण्याच्या संघांना संमिश्र यशाचा सामना करावा लागला. एकीकडे पुरुष विभागात पुण्याच्या संघाने अजिंक्यपदावर मोहोर उमटवली, तर दुसरीकडे महिला विभागात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

महिला विभागात ठाण्याच्या संघाने अजिंक्यपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. पुरुष विभागात मुंबई उपनगरचा संघ उपविजेता ठरला. पुण्याचे राहुल मंडल व काजल भोर हे अनुक्रमे राजे संभाजी व राणी अहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले.

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सुरेश जाधव क्रीडानगरीत झालेल्या पुरुष विभागाच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरला पुण्याने अत्यंत चुरशीच्या लढतीत २५-२३ असे २ गुणाने नमविले. मध्यंतराच्या ६-७ अशा पिछाडीनंतर मुंबई उपनगरने बहारदार खेळी करीत १६-१६ अशी बरोबरी केली होती; परंतु नऊ मिनिटाच्या जादा डावात पुण्याने बाजी मारीत गतवर्षीच्या पराभवाची सव्याज परतफेड केली.(Latest Marathi News)

राहुल मंडल व प्रतीक वाईकर हे पुण्याच्या विजयाचे शिल्पकार ठरले. राहुलने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचे, तर प्रतीकने सर्वोत्कृष्ट संरक्षकाचे पारितोषिक पटकावले.

Kho-Kho: महाराष्ट्र राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात पुणे, तर महिला गटात ठाण्याने मारली बाजी
'राहुल गांधींच्या भूमिकेशी आपण पूर्णपणे सहमत'; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'या' कारणावरून थेट संघर्ष

राहुलने १.३०, १.४०, १.३० मि. संरक्षण करीत आक्रमणात तीन गडी टिपले. प्रतीकने आक्रमणात सहा गडी बाद करीत २.१० मिनिटे संरक्षणाचा खेळ केला. अथर्व डहाणे व आदित्य गणपुले यांनीही प्रत्येकी १.४० मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळत संघाच्या विजयात मोठी कामगिरी केली.

मुंबई उपनगरचा ओंकार सोनवणे सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने आपल्या धारदार आक्रमणात पहिल्या डावात ४ व दुसऱ्या डावात ३ गडी टिपले.

पूजा, रेश्‍माचा ठसा

महिला गटात ठाण्याने पुण्यावर १५-१४ अशी मात केली. मध्यंतराची ७-६ ही एक गुणाची आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. पूजा फरगडेने आक्रमणात सहा गुण वसूल केले. रेश्मा राठोडने (१.२०, १.१० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळ करीत संघाचा विजय साकारला. पूजा व रेश्मा या अनुक्रमे सर्वोत्कृष्ट आक्रमक व संरक्षक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. किशोरी मोकाशीने १.४० व २ मिनिटे संरक्षण करीत संघाच्या विजयात मोलाची साथ दिली. (Latest Marathi News)

Kho-Kho: महाराष्ट्र राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात पुणे, तर महिला गटात ठाण्याने मारली बाजी
Ajit Pawar: 'महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर...' अजित पवार गटाचे आमदार भुजबळांच्या पाठीशी पण वरिष्ठांकडून देण्यात आल्या खास सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.