कोल्हापूर : राज्यातील १२०० वर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या. यात कोल्हापुरातील सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपकाळात जाहीर केलेली वेतनवाढ दिली. संपकरी कर्मचारी कामावर हजर झाल्यास निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. एवढे असे असूनही राज्यभरात ७२ हजारांपैकी १८ हजार ८०० कर्मचारी कामावर आहेत.
राज्यातील जवळपास ६४ लाख प्रवाशांना ससेहोलपट सोसावी लागत आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप २६ दिवस झाले तरी सुरू आहे. शासनाने संपकऱ्यांशी चर्चा करून वेतन वाढीसह महागाई भत्ता व घरभाडे भत्ता शासकीय कर्मचाऱ्यानुसार देण्याचे जाहीर केले. त्यानुसार आज वाढीव वेतन दिले. जे कर्मचारी संपकाळात पूर्ण दिवस हजर होते त्यांचे वाढीव वेतन निघाले. संपकरी जेवढे दिवस कामावर होते तेवढेच वेतन दिले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत तरीही विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील बहुतांशी कर्मचारी संपात आहेत. सांगलीत १० जवळपास १०० टक्के कोल्हापुरात ७० टक्के साताऱ्यात ६० टक्के, रत्नागिरी ६० टक्के, सिंधुदुर्गात ५० टक्के प्रवासी वाहतूक सुरू आहे.
दृष्टिक्षेपात
रोज ८ ते १० कोटींचा फटका
राज्यात दररोज ४० ते १७० फेऱ्या
१८ हजारपैकी, केवळ सात हजार गाड्या सेवेत
संचित तोटा १२०० कोटींवर
कोरोना काळात ८०० कोटींचा महसूल बुडाला
नव्या वेतनवाढीचा दरमहा २०० कोटींचा भार
संपकरी कामावर परतण्याची शक्यता धूसर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.