Missing Girls : बेपत्ता मुली, महिलांच्या शोधासाठी महिला आयोग आक्रमक; पोलीस महासंचालकांना दिले निर्देश

Maharashtra state women commission rupali chakankar on search of missing girls women
Maharashtra state women commission rupali chakankar on search of missing girls women
Updated on

मुंबई: दिल्लीत श्रद्धा वालकर या तरूणीची तिच्या लिव्ह इन बॉयफ्रेंडने हत्या केल्याचे घटनेने सगळा देश हदरला आहे. यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बेपत्ता झालेल्या महिलांसाठी राज्य महिला आयोग पुढे सरसावला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.

चाकणकर म्हणाल्या की "श्रद्धा वालकरची झालेली हत्या अतिशय हृदयद्रावक आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने याचा राष्ट्रीय महिला आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. पण दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्याही वाढत आहे."

"यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सहभाग असण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने जानेवारी २०२२ पासून हरवलेल्या व्यक्तींचा विभाग, मुंबई येथे सातत्याने संपर्क केला आहे. त्यांना सातत्याने पत्र व्यवहार केला आहे आणि याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोग मागवून त्याबाबत कारवाई करण्याचे निर्णय देत आहे."

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Maharashtra state women commission rupali chakankar on search of missing girls women
Nikhil Khadse Death : निखिल खडसेंची आत्महत्या की हत्या? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

"या हरवलेल्या व्यक्तींची, बेपत्ता मुली आणि महिलांची संख्या वाढत असताना याबाबत पोलीस महासंचालकांनी विशेष मोहीम राबवावी. यासाठी एक समिती नेमावी या समितीच्या अनुषंगाने बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेत असताना या मोहिमेच्या अंतर्गत त्यांचा तपास करावा. जेणेकरून एखादी घटना घडून गेल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा घटना घडूच नये यासाठी आपण सतर्क राहणं फार गरजेचे आहे."

म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत की, त्यांनी एक विशेष शोध मोहीम घ्यावी आणि यासाठी तातडीने समिती नेमून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, अदे निर्देश दिले असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

Maharashtra state women commission rupali chakankar on search of missing girls women
Mansi Naik Divorce: 'वाट माझी...'! शेवटी मानसी नाईकचा घटस्फोट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.