पुणे - राज्यातील ४ हजार ६४४ पदांच्या तलाठी भरतीसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यातील पुणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक म्हणजे एक लाख १४ हजार ६८४ उमेदवारांनी तर सर्वात कमी अर्ज वाशीम जिल्ह्यासाठी दोन हजार ६३६ उमेदवारांनी अर्ज केले आहे.
गंमत म्हणजे शुल्कापोटी सरकार अथवा कंपनीकडे १० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील ही मोठी भरती आहे. पुण्यातील भूमि अभिलेख कार्यालयातील जमावबंदी आयुक्त आणि संचालक यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतीच जिल्हानिहाय अर्जदारांची संख्या घोषित करण्यात आली आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून, १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत १९ दिवस तीन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.राज्य सरकारच्या विविध भरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणाने वादात सापडत आहे.
अशा स्थितीत तब्बल चार हजार पदांची ही भरती राज्यभरातील उमेदवारांसाठी आशेचा किरण आहे. राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणारे उमेदवारही यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर उतरले आहे.
निवडक जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या -
अहमदनगर - ६१,६३३
छत्रपती संभाजीनगर - ३२०८४
बीड - ४८७७२
जळगाव - ४८३३६
नागपूर - ५७८७२
नाशिक - ६८०३८
पुणे - ११४६८४
रायगड - १००५३७
सोलापूर - ५८९७७
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.