ओमिक्रॉनवर टास्क फोर्सची बैठक, बुस्टर डोसवर चर्चा

omicron
omicronesakal
Updated on

मुंबई : जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमिक्रॉनने आता देशासह राज्याचीही चिंता वाढवली आहे. राज्यातील ओमिक्रॉन (Omicron Varient) आता 10 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनच्या वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकार अलर्टवर आहे. लहान मुलांचं लसीकरण आणि बुस्टर डोससाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (rajesh tope) म्हटलं आहे. विषाणूबद्दल अधिका माहिती घेऊन प्रतिंबधक उपाय लागू करण्यासाठी राज्यातील टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

ओमिक्रॉनवर टास्क फोर्सची बैठक

राज्यातील टास्क फोर्सच्या तज्ञांनी दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेतला. ओमिक्रॉन विषाणूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. टास्क फोर्सची रात्री उशिरा पर्यँत दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डोक्टरांसोबत झाली बैठक पार पडली. ऑनलाइन झालेल्या बैठकीत ओमिक्रॉन किती घातक आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत या सगळ्या विषयावर झाली चर्चा करण्यात आली.

omicron
भारत-पाक सीमेवर महिलेची प्रसुती; बाळाच्या नावाची होतीये चर्चा

बूस्टर डोस घेण्याविषयी चर्चा

बैठकीत झिम्बाब्वे मध्ये आढळलेल्या विषाणूवर देखील झाली चर्चा झाली. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना देखील ओमीक्रोनची लागण होतेय ,त्यामुळे बूस्टर डोस घेण्याविषयी देखील काही डॉक्टरांनी या बैठकीत सूर आळवल्याची माहिती मिळत आहे. ओमिक्रॉनमुळे टाळेबंदी ऐवजी नियमांचं कठोर पालन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याच मत तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. झालेल्या बैठकीचा एकूण आढावा मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर केला जाणार आहे. ओमिक्रॉनच्या भयामुळे टाळेबंदीऐवजी कोरोना प्रतिबंधक नियमांचं कठोर पालन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत या बैठकीत तज्ज्ञांनी मांडलं.

omicron
दंगलीमागे ठाकरे सरकारचा छुपा हेतू; खासदार नवनीत राणा यांचा आरोप

चर्चेचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देणार

ही बैठक 6 डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत चालली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्यानंतर आता बैठकीचा एकूण आढावा तसेच चर्चेचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच सादर केला जाणार आहे. त्यानंतर कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.