Teacher Recruitment : तब्बल बारा वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला सरकारचा हिरवा कंदील

तब्बल बारा वर्षांपासून रखडलेली मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यास राज्य सरकारने बुधवारी (ता. २१) अखेर हिरवा कंदील दाखवला.
teacher recruitment
teacher recruitment esakal
Updated on

पुणे - तब्बल बारा वर्षांपासून रखडलेली मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यास राज्य सरकारने बुधवारी (ता.२१) अखेर हिरवा कंदील दाखवला. सध्या रिक्त असलेल्या जागांपैकी निम्म्या जागा भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

मात्र या जागा भरताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निश्‍चित करून दिलेल्या नियमावलीच्या आधारे शिक्षकाच्या रिक्त जागा भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करावी, असा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला आहे.

teacher recruitment
PMP : पुणे महापालिका पीएमपीला देणार २०० कोटी रुपये

या रिक्त जागांबाबत आणि मागील एक तपापासून ही भरती बंद असल्याबाबतचे वृत्त सकाळने ‘राज्यात शिक्षकांच्या अठरा हजार जागा रिक्त’ या शीर्षकाखाली १९ जून च्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत, २१ जून २०२३ रोजी सरकारने याबाबतची भरती प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.

राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी घातली होती. ही बंदी २०१९ मध्ये उठविण्यात आली. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होत नसल्याचे दिसून आले होते.

दरम्यान, राज्यातील तत्कालीन महायुती सरकारने २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल`च्या माध्यमातून शिक्षक भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली होती. त्यावेळी सुमारे पावणे दोन लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.

teacher recruitment
Pune News : गावे महापालिकेत, पण नियंत्रण विभागीय आयुक्तांचे

यापैकी केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांतील १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमधील १ हजार ३०१ जागांचा समावेश आहे. प्रत्यक्षात कन्नड, बंगाली, तेलगू, गुजराती अशा भाषांच्या शिक्षकांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

भरतीसाठीच्या प्रमुख मार्गदर्शक सूचना

- नवीन भरतीनुसार सेवेत दाखल शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या रद्द

- सन २०२२ मध्ये झालेल्या जिल्हांतर्गत बदल्या ही शेवटचीच संधी

- आता जिल्हा बदलावयाचा असल्यास आधीच्या जिल्ह्यातील नोकरीचा राजीनामा देणे अनिवार्य

- नवीन जिल्ह्यातील नियुक्तीसाठी पुन्हा नव्याने भरती प्रक्रियेनुसार नियुक्ती मिळणार

- शिक्षणसेवक कालावधी संपल्यानंतर परीक्षाविक्षाधिन कालावधीतील सेवेचे मूल्यमापन अनिवार्य

- मूल्यमापनासाठी मूल्यमापन परीक्षा द्यावी लागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.