Maharashtra: राज्यातील 'या' महापालिकेची झाली तब्बल २७ वर्षानंतर भंगारातून मुक्ती !

Maharashtra: राज्यातील 'या' महापालिकेची झाली तब्बल २७ वर्षानंतर भंगारातून मुक्ती !
Updated on

Mahapalika: महापालिका कार्यालयात मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जमा झाले होते. त्यामुळे कार्यालयाला बकालपणा आला होता. त्यामुळे आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांची साफसफाई मोहीम राबवण्यात आली. यात जमा झालेले जुने कपाटे, मोडकळीस आलेल्या खुर्च्या यासह एक टन रद्दी आदी भंगारात काढण्यात आले. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेने २७ वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला आहे.

उल्हासनगरात ८ ऑगस्ट १९६० रोजी स्थापन झालेल्या नगरपरिषदेचे २१ ऑक्टोबर १९९६ मध्ये महानगरपालिकेत रूपांतर झाले होते. तेव्हा नवीन कपाटे, खुर्च्या, टेबल आदी साहित्य घेण्यात आले होते; मात्र या वस्तू २७ वर्षांत जुन्या झाल्या आहेत.

Maharashtra: राज्यातील 'या' महापालिकेची झाली तब्बल २७ वर्षानंतर भंगारातून मुक्ती !
Ulhas Bapat : उल्हास बापटांना उध्दव ठाकरेंचा कॉल, काय झाली चर्चा?

तसेच सर्व दालनात मोठ्या प्रमाणात रद्दी जमा झाली होती. भंगार दिसणारी कपाटे हे दर्शनी भागात ठेवण्यात आल्याने कार्यालयाला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले होते. पालिका आयुक्त अजीज शेख यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत दोन दिवसांच्या सुट्टीत राजीव गांधी प्रशासकीय मोहिमेअंतर्गत संपूर्ण भंगार साहित्य साफसफाई करण्याचे आदेश उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना दिले. त्यानुसार अधिकारी, कर्मचारी यांनी मोहीम राबवली.

लेखा कार्यालयाच्या प्रथमदर्शनी भागातील भंगार कपाटांनी व्यापलेला भाग आणि कार्यालयातील भुरशी चढलेल्या फायलींची छाननी करण्याचे काम मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडले.

पालिकेतील बकालपणा संपुष्टात

यासंदर्भात आयुक्त अजीज शेख यांच्याशी संपर्क साधला असता, साथी हात बढाना प्रमाणे दोन दिवसांच्या साफसफाई मोहिमेत विद्रूपीकरणास कारणीभूत दिसणारे सर्व भंगार काढण्यात आल्याने पालिकेतील बकालपणा संपुष्टात आला आहे. त्यामुळे नीटनेटकेपणा सोबतच प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra: राज्यातील 'या' महापालिकेची झाली तब्बल २७ वर्षानंतर भंगारातून मुक्ती !
Ulhasnagar News : ननावरेंच्या भावासह चालक आणि निकटवर्तीयांचे पोलींसांनी नोंदवले जबाब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.