२२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; पाहा नवे नियम

२२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; पाहा नवे नियम
Updated on

maharashtra unlock guidelines : मुंबई - महाराष्ट्रातील संसर्गदर कमी असलेल्या २२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला असून आता दुकाने, मॉल, जिम, स्पा, केशकर्तनालये सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात संपूर्ण क्षमतेनिशी काम करणे आता शक्य होणार असून मुंबईतील उपनगरी गाड्या मात्र अद्याप सर्वांना सरसकट खुल्या करता येणे शक्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर, बीड, रायगड, पालघर या कोरोना संसर्ग जास्त असलेल्या ११ जिल्ह्यांत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

२२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; पाहा नवे नियम
...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत तर शनिवारी ३ वाजेपर्यंत उघडी ठेवता येतील. बागा, उद्याने, खेळाची मैदानेही आता पूर्वीप्रमाणे खुली ठेवली जातील. रविवारी मात्र दुकाने मॉल पूर्णत: बंद राहतील. मॉलमधील तसेच एकल चित्रपटगृहे, नाट्यगृहे मात्र बंद राहणार आहेत. विवाहसमारंभ वाढदिवस याबद्दलही पूर्वीची अट लागू राहील. शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.

२२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; पाहा नवे नियम
याच महिन्यात कोरोनाची तिसरी लाट, ऑक्टोबरमध्ये उद्रेक!

निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांत...

- दुकाने तसेच मॉल सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील.

- रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल बंद राहतील.

- सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग आदींसाठी खुली

- सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणार.

- सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु

- जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर, केश कर्तनालये सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

- चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉलमधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील.

- सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बंदच

- सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

- रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.

- वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शने, मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()