Maharashtra Unlock : तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात?

The state of Karnataka did the most unlock in the country after the lockdown
The state of Karnataka did the most unlock in the country after the lockdown
Updated on

राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे नियम आता शिथिल होणार आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया असणार आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड पेशंटच्या संख्येनुसार कोणता जिल्हा कोणत्या टप्प्यात असणार आहे हे ठरवण्यात येईल. याबाबतचे नवी नियमावली मध्यरात्री जारी करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाच टप्पे सध्या ठऱवण्यात आले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या दोन निकषांनुसार अनलॉक प्रक्रिया कशी असणार आहे हे राज्य सरकारने सांगितलं आहे. मात्र, प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांच्या आधारे जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध शिथिल करण्याचा किंवा ते कडक कऱण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासन काढणार आहे.

The state of Karnataka did the most unlock in the country after the lockdown
पुणे शहरात आज ७७ ठिकाणी लसीकरण

जिल्ह्यांची पाच गटांमध्ये वर्गवारी

1

पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आणि 25 टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे पहिल्या टप्प्यात येतील.

2

ज्या जिल्ह्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असणारे जिल्हे आहेत. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार हे जिल्हे दुसऱ्या टप्प्यात असतील.

The state of Karnataka did the most unlock in the country after the lockdown
पुणे-मुंबईमध्ये निर्बंध लागू करण्यापूर्वीच रुग्ण घटले; ‘आयआयटी’चे संशोधन

3

ज्या जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 40 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्हे असतील.

4

चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये 10 ते 20 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 60 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

5

ज्या जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि 75 टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. रेड झोन असलेल्या आणि 4 टप्प्यांमध्ये नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील गटात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.